IMPIMP

Pune Maval Gram Panchayat Elections | मावळातील 9 ग्रामपंचायतीच्या ‘या’ तारखेला निवडणुका

by nagesh
Gram Panchayat Election | Gram Panchayat Elections expenses should be submitted order collector office pune to sarpanch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Maval Gram Panchayat Elections | महाराष्ट्र राज्य निवडणुक (Maharashtra Election Commission ) आयोगाने सार्वत्रिक ग्रामपंचात निवडणुकीचा (Gram Panchayat Elections) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात एकूण २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहेत. पुण्यातील (Pune District) मावळ (Maval Tahsil) भागातील नऊ ग्रामपंचायतींचा या यादीत समावेश आहे. मावळ तालुक्यातील सावळा (Savala), देवले (Devale), भोयरे (Bhoyre), शिरगाव (Shirgoan), वरसोली (Varsoli), इंदोरी (Indori), कुणे नामा (Kune Nama), निगडे (Nigade), गोडुंब्रे (Godunbre) या गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठी थेट नागरिकांमधून निवड करण्यात येणार आहे. जोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होत नाही, तोपर्यंत गावामध्ये आचारसंहिता लागू असेल. त्यामुळे, या दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा इच्छूक उमेदवारांना करता येणार नाहीत.

 

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.१८) नोव्हेंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस
प्रसिद्ध करावयाची आहे. सोमवारी (दि.२८) नोव्हेंबर ते शुक्रवारी (दि.२) डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३
या वेळेमध्ये उमेदवारांना अर्ज करता येतील. सोमवार (दि.५) डिसेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल.
बुधवार (दि.७) डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह वाटण्यात येईल.
त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. रविवारी (दि.१८) डिसेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतचे मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडेल. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येतील.

 

 

Web Title :- Pune Maval Gram Panchayat Elections | election declared in nine gram panchayats in maval pune election news

 

हे देखील वाचा :

रोहित, विराट, द्रविडसोबत चर्चा करून भविष्याचा निर्णय घेऊ; BCCI ने भूमिका केली स्पष्ट

Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंनी धरलं उध्दव ठाकरेंनाच जबाबदार, म्हणाले – ‘प्रकल्प त्यांच्यामुळेच…’

President Draupadi Murmu | पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचे राष्ट्रपती विरोधात वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?’

 

Related Posts