IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Police | Police Naik Dilip Borkar of Shirgaon Police Chowki died of a heart attack at 36

पुणे / तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Police | तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) शिरगाव पोलीस चौकीत (Shirgaon Police Chowki) कार्यरत असणारे पोलीस नाईक दिलीप बोरकर (Police Naik Dilip Borkar) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. आज (रविवार) साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने देहूरोड येथील पवना हॉस्पिटलमध्ये (Pavana Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Pune Pimpri Chinchwad Police)

दिलीप बोरकर हे शिरगाव पोलीस चौकशी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत होते (Pune Crime).
दिलीप बोरकर हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील होते. अत्यंत साध्या स्वभावाचे आणि मितभाषी असल्याचे त्यांच्या 2007 च्या बॅचचे मित्र घाडगे यांनी पोलीसनामा सोबत बोलताना सांगितले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉस्पीटलमध्य धाव घेतली (Pune Police). बोरकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Police)

शिरगाव पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ (Police Inspector Vanita Dhumal) यांनी सांगितले की,
दिलीप बोरकर हे 2007 च्या बॅचचे आहेत. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) आहेत.
यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Police | Police Naik Dilip Borkar of Shirgaon Police Chowki died of a heart attack at 36

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

Drink Water Before Brushing | सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापुर्वी पाणी प्यावे कि नाही?; जाणून घ्या नेमकं सत्य काय

Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

Aditya Thackeray | शिवसेना-मनसे वाद पोहोचला अयोध्येत; ‘असली आ रहा है, नकली से सावधान’चे बॅनर झळकले’

Related Posts