IMPIMP

Radhakrishna Vikhe Patil | ‘बाहेरून कीर्तन आतून तमाशा’, केजरीवाल यांच्या भेटीवर विखे पाटलांची विरोधकांवर टीका

by nagesh
 Radhakrishna Vikhe Patil | radhakrishna vikhe patils criticism of oppositions over arvind kejriwal sharad pawar uddhav thackeray meet

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन विरोधकांच्या मोट बांधणीला काही अर्थ नसून ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जगात प्रतिमा उंचावत असून विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यांना आपले स्वत:चे दुकान बंद होण्याची भीती वाटत असल्याने ते एकत्र येत आहेत, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले, नाहीतर अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी काय बोलले होते हे जरा तपासा. त्यामुळे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावेळी सहकार्य का केलं नाही?

नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटनावरून सामनामधून टीका केली आहे की विरोधकांची नावे या निमंत्रण पत्रिकेत यायला हवी होती. यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, त्यांची ही टीका व्यक्तीदोषातून केली आहे. जगभरात भारत हा समृद्ध आणि ताकदवान देश म्हणून पुढे येत आहे. त्यातच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे जगाने स्विकारले आहे आणि त्यांच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन होत असताना विरोधकांना पोटशूळ का उठला आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच एक आदिवासी महिलेने राष्ट्रपदीपदासाठी उमेदवारी दाखल केली होती त्यावेळी विरोधकांनी त्यांना सहकार्य का केलं नाही? असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला आहे.

 

 

जागावाटपावरुन मतभेद नाहीत

जागावाटपावरुन शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) मध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. जागा वाटपावरुन दोन गटांमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. जरी एखाद्या पक्षाचा नेता जागावाटपाबाबत बोलत असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

 

 

राज्यात काँग्रेसला कुठं स्थान आहे

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) आणि नाना पटोले (Nana Patole)
यांच्यातील राजकीय कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे.
यावर बोलताना हा काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रात काँग्रेसला कुठलं स्थान आहे, काँग्रेस मुठभर राहिली आहे अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
काँग्रेसमधील नेते सत्तेसाठी हपापलेले आहेत, मंत्र्यांना सगळं काही मिळालं.
मात्र कार्यकर्त्यांना काहीही मिळालं नाही याबाबत कार्य़कर्त्यांना विचारायला हवं, असंही विखे पाटील म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Radhakrishna Vikhe Patil | radhakrishna vikhe patils criticism of oppositions over arvind kejriwal sharad pawar uddhav thackeray meet

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परस्पर हडप केली 50 लाखांहून अधिक रक्कम; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील गडबड घोटाळा, 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Triple Talaq Case | पुणे ट्रिपल तलाक केस : विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीला अटक ! सासु, सासरे, नणंद व नंदावाची अटकपुर्वसाठी न्यायालयात धाव

75 Rs New Currency Launch | अर्थमंत्रालाची घोषणा, बाजारात येणार ७५ रुपयांचे नवे चलन; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी करणार लाँच

Maharashtra Congress | नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी: हायकमांड महाराष्ट्रात भाकरी फिरवणार?

 

Related Posts