IMPIMP

Ramdas Kadam | गेल्या 3 वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; दिला ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

by nagesh
Maharashtra Politics | ncp leader sanjay kadam will enter the thackeray group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून सेनेला वारंवार धक्के
बसत आहेत. शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे शिवसेनेतून बाहेर पडणार
असल्याची माहिती समोर आली आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रामदास कदम (Ramdas Kadam) हे गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांचा विधानपरिषद आमदारकीचा (Legislative Council MLA) कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नव्हती. तेव्हापासून ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आपण अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आज त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा (Resignation) दिल्याने आता त्यांची पुढची वाटचाल काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला होता. मात्र, तेव्हा रामदास कदम हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत राहिले होते. त्यातच योगेश कदम यांच्या नेतृत्वात त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या गुहागर – दापोली भागातील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

 

काय म्हटले रामदास कदम यांनी ?

शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती.
मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही. हे मला पहायला मिळालं.

 

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही.
उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावर कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही.
मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही.
मागील 3 वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे.
ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळात माझा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

 

2019 साली आपण राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं.
राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल.
अशी विनंती आपल्याला केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दु:ख माझ्या मनात आहे.
शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती.
आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Ramdas Kadam | shiv sena leader ramdas kadam will finally leave shiv sena

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | रंग कामातील तोटा भरुन काढण्यासाठी केल्या जबरी चोऱ्या; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, 7 गुन्हे उघडकीस

Pune Crime | 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार, लातूरच्या मंगेश पटणेविरूध्द पुण्यात FIR

 

Related Posts