IMPIMP

RBI Hike Repo Rate | कर्जे महागणार ! आरबीआयकडून रेपो दरात 50 बेसिक पॉईंटची वाढ

by nagesh
RBI Hike Repo Rate | rbi hike repo rate by 0 50 monetary policy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन RBI Hike Repo Rate | महागाईच्या खाईत सापडलेल्या जनतेला त्यातून सूटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India-RBI) पतधोरणाच्या बैठकीत मोठे निर्णय मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीनंतर आज रेपो रेट (Repo Rate) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसिक पॉईंट्सची वाढ करण्यात (RBI Hike Repo Rate) आली आहे, त्यामुळे तो आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरबीआयकडून (RBI) रेपो रेट पुन्हा वाढवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना एक धक्का बसला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती सांगितले की, “महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेट मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. या दरवाढीनंतर 4.40 टक्के रेपो रेट झाला होता. आज 0.50 टक्क्यांनी आणखी रेपो दर वाढवण्यात आले आहेत. आता रेपो दर 4.90 टक्के इतका असणार आहे. यामुळे सगळ्या प्रकारची कर्ज महाग होणार आहेत.

 

 

दरम्यान, याचा सर्वसामान्यांना एक झटका बसला आहे. रेपो दरात वाढ झाल्याने कर्जाचा EMI वाढत असल्याने बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे.
आरबीआयकडून बँका ज्या दराने कर्ज घेतात तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढेल आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.
त्यामुळे तुमचे गृह कर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज हे सर्व पुढील काळात महाग होणार असल्याचं चित्र आहे.

 

Web Title :- RBI Hike Repo Rate | rbi hike repo rate by 0 50 monetary policy

 

हे देखील वाचा :

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Pune MHADA Online Registration | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत; ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी होणार

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात

Tata Elxsi Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टाॅकने केली गुंतवणूकदारांची चांदी; 1 लाखावर 4 कोटींचा जबरदस्त परतावा, जाणून घ्या

Related Posts