IMPIMP

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

by nagesh
Sambhaji Bhide | sabhaji bhide meet cm eknath shinde in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath
Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) उपस्थित होते. दरम्यान, भेटीनंतर संभाजी भिडे यांनी
पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, शिवसेना (Shivsena)-भाजप (BJP) व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाहीत. राम लक्ष्मण एकत्र आले
पाहिजेत. भगवंताच्या कृपेने ती वेळ येईल आणि भविष्यात सगळे एकत्र येतील असा विश्वास संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगले मुख्यमंत्री लाभले. धाडसाने अनेक निर्णय घेतात. प्रत्येक निर्णय उत्कृष्ट घेतले आहेत. बाळासाहेब (Balasaheb Thackeray), शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांचे विचार घेऊनच पुढे आले. शिवसेना-भाजप व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही. राम लक्ष्मण एकत्र पाहिजेत. भगवंत त्यासाठी मदत करतोय. भविष्यात सगळे एकत्र येतील असं त्यांनी सांगितलं.

 

ते पुढे म्हणाले, शिवरायांचा वारसा संपूर्ण देशात आहे.
जिथे जिथे हिंदुत्वाला मानणारी सरकार आहेत त्या ठिकाणी विचारांचा वारसा आहे. बाळासाहेबांची मूर्तिमंत प्रतिमा उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackeray) आहे.
अतिशय चांगली व्यक्ती आहे.
राजकारणात हेलकावे खात नाव भरकटली आहे. त्यांच्या मनात नसताना हे घडलं आहे.
ते दुरुस्त होईल असं वाटतं असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं.

 

 

Web Title :-  Sambhaji Bhide | sabhaji bhide meet cm eknath shinde in mumbai

 

हे देखील वाचा :

MLA Sunil Tingre | अखेर पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा, मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने रचला विराट विक्रम! श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे सोडत रचला विश्वविक्रम

Chandrashekhar Bawankule | राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा, म्हणाले- ‘यापुढे खोटारडेपणा केला, तर…’

Nana Patole | ‘देवेंद्र फडणवीस ‘सुपरमॅन’, मात्र आता…’, नाना पटोलेंची खोचक टीका

 

Related Posts