IMPIMP

Sand Mafia Crushed Policeman | वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

by nagesh
Sand Mafia Crushed Policeman | Police Death In Kalaburagi Nelogi Police Station Of Karnataka

सरकारसत्ता ऑनलाईन – Sand Mafia Crushed Policeman | कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील कलबुर्गीमध्ये गुरूवारी सायंकाळी वाळू माफियांनी एका हेडकॉन्स्टेबलला ट्रॅक्टरखाली चिरडलं आहे. ही घटना जेवरगी तालुक्यातील नारायणपूरजवळील अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्‍या ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या नेलोगी पोलिस स्टेशनमधील पोलिसासोबत घडली आहे. (Sand Mafia Crushed Policeman)

म्हैसूर चौहान (51) असे मृत्यूमुखी पडलेल्या पोसिसाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
म्हैसुर चौहान यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर थांबला नाही.
चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून भरधाव वेगात चालविला. त्यामुळे पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी ड्रायव्हर सिध्दना याला अटक केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Sand Mafia Crushed Policeman | Police Death In Kalaburagi Nelogi Police Station Of Karnataka

Related Posts