IMPIMP

Sangli Accident News | सांगलीच्या आयर्विन पुलावर भीषण अपघात; टेम्पो-फोरव्हिलरचा चक्काचूर, 2 ठार 8 जण गंभीर जखमी

by nagesh
Sangli Accident News | Two dead and eight injured in two vehicle accident on irwin bridge in sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli Accident News | सांगली येथील कृष्णा नदीवरील (Krishna River) आयर्विन पुलावर दोन गाड्यांचा भीषण अपघात (Sangli Accident News) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव छोटा टेम्पो (Tempo) आणि फोरव्हिलर (Four Wheeler) वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला. या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु (Died) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. ही घटना रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, येथील तुंग येथून एक भजनी मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ येथे भजन कार्यक्रमासाठी छोट्या टेम्पोमधून निघाले होते. तर सांगली शहरातून (Sangli Accident News) कसबे डिग्रजकडे फोरव्हिलर निघाली होती. भरधाव असणाऱ्या दोन्ही गाड्या कृष्णा नदीवरील असणाऱ्या आयर्विन पुलावर येताच समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातामध्ये टेम्पो चालकासह 1 वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर छोटा टेम्पो आणि फोरव्हिलर वाहन यातील 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital, Sangli) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Sangli Accident News)

 

दरम्यान, या अपघातात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.
तर फोरव्हिलर वाहनातील सुरक्षा कवच असणारे बलूनही फुटले आहेत.
अपघातात जखमी पैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
रात्री उशिरापर्यंत मृत आणि जखमींची ओळख पाटवण्याचे काम सुरू होते.
या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात (Sangli City Police Station) झाली आहे.

 

Web Title :- Sangli Accident News | Two dead and eight injured in two vehicle accident on irwin bridge in sangli

 

हे देखील वाचा :

Police Inspector Transfer Pune | पुणे शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; शिवाजीनगर, सहकारनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांची ट्रान्सफर

Pune Crime | हॉटेलमधील भांडणात मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार ! डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Local Train Ticket Prices | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! आजपासून AC लोकलचा प्रवास स्वस्त, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात घट

 

Related Posts