IMPIMP

Sanjay Raut | ‘मला माहित आहे राज्यकारभार कोण चालवत’ पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा चिमटा

by nagesh
Sanjay Raut | devendra fadnavis is handling maharashtra govt says sanjay raut in press conference

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा चिमटा काढला. ते म्हणाले, ‘मी तुरुंगात असताना राज्य सरकारने (State Government) काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार आहे. यावेळी त्यांना ते मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार का असा प्रश्न केला असता राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस चालवतात. ते अनुभवी नेते आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यांनी केलेला देवेंद्र फडणवीसांचा असा उल्लेख राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या काही निर्णयांचे स्वागत केले आहे. ‘मी तुरुंगात असताना राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मी त्या निर्णयांचं स्वागत करतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. मी तुरुंगात असताना मला जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचे, तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरीबांना घरं देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते, ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती. पण महाराष्ट्र सरकारने म्हाडाला सदर अधिकार पुन्हा दिला आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हटले.

 

ते पुढे म्हणाले, काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशात चांगले वातावरण तयार झाले आहे.
मला ईडी (ED) किंवा त्या सारख्या संस्थाबद्दल काही बोलायचे नाही. त्यांनी कटकारस्थान रचलं असेल,
त्यात त्यांना आनंद मिळाला असेल. या आनंदात मला सहभागी होता आले, हाच माझा आनंद आहे.
मला कोणाविषयी काहीही तक्रार नाही. मी आणि माझ्या पक्षाने जे काही भोगायचे ते भोगले आहे.
माझ्या कुटुंबालाही याचा मनस्ताप झाला. पण, मी या गोष्टी स्वीकारतो, अशा गोष्टी घडत असतात.
पण आजपर्यंतच्या इतिहासात देशाने या प्रकारचे सूडबुद्धीचे राजकारण कधी पाहिलेले नाही.
आपल्या देशात दुश्मनांनाही चांगल्या पद्धतीने वागवलं जातं. तरीही मी या सगळ्याचा स्वीकार करतो.
मी ईडी किंवा कोणत्या यंत्रणेला दोष देणार नाही. प्रत्येकाला चांगलं काम करण्याची संधी मिळते,
त्यांनी चांगलं काम करावं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sanjay Raut | devendra fadnavis is handling maharashtra govt says sanjay raut in press conference

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | ‘धोतऱ्याच्या कडू बिया’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शंभूराज देसाई यांचा टोला, म्हणाले-‘102 दिवस कारागृहात असल्यामुळे त्यांना…’

Pune Crime | कोरोनामध्ये पती गमाविलेल्या महिलेचा दीराने केला विनयभंग; डेक्कन पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | 5 लाख रुपयांच्या व्याजाचा हप्ता देणे चुकल्यास दररोज 15000 दंड घेणार्‍या रास्ता पेठेतील सावकारावर कारवाई

 

Related Posts