IMPIMP

Sanjay Raut | ED ‘ही’ भाजपची ATM मशीन झालीय, संजय राऊतांची टीका (व्हिडिओ)

by nagesh
Azaan On Loudspeaker | sanjay raut big statement maharashtra home minister has also issued a notice stating how much decibel level should be there while observing azaan on loudspeaker

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्रातील भाजपचा (Maharashtra BJP) एक मोठा नेता आणि दिल्लीतील एक नेता आहे. या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला आहे. मुंबईतील ट्रायटेंड ग्रुप (Tritend Group in Mumbai) आहे. या ग्रुपमधून अनेक मोठे व्यवहार झाले आहे. या आधिच्या सरकारने या ग्रुपला कामं दिली होती, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांवर ईडीच्या (ED) धाडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर ठरल्याप्रमाणे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. सरकार पाडण्यासाठी हे मोठे षडयंत्र आहे. आतापर्यंत आम्ही ईडीकडे 50 नावं दिली. प्रत्येक वेळा आम्ही ईडीला माहिती दिली. मात्र, आम्ही जे काही आरोप केले त्याबद्दल चौकशी करत नाहीत. आमच्या तक्रारी बोसग ठरवल्या जात असल्याचे राऊत म्हणाले.

 

 

तोपर्यंत आयटीच्या धाडी पडतील
राऊत पुढे म्हणाले, आयटीची (IT) भानामती सुरु आहे. जोपर्यंत निवडणुका (Election) होत नाही तोपर्यंत आमचे कार्यकर्ते, शिवसेनेच्या शाखांवर आयटीच्या धाडी पडतील. आयटी आणि ईडी ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उभे राहत आहे, अशा ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. या संस्था केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच टार्गेट करत आहेत. यांना कुणी प्रश्न विचारत नाही. केवळ शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) सवाल करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेना लवकरच खुलासा करणार
किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) मुलाने पैसे लाटले. मिस्टर ढवंगाळे यांच्या 75 कंपन्यांची यादी मी दिली. देशात ईडीच्या सर्वात जास्त धाडी पडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 60 लोकांवर धाडी पडल्या. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीने कारवाई केली नाही. ईडीची जी भानामती आहे, ती कोण चालवत आहे, त्याचा लवकरच शिवसेना खुलासा करणार आहे. एका दुधवाल्याकडे 8 हजार कोटी सापडतात मात्र त्याच्यावर ईडी कारवाई करत नाही. त्यांच्याकडे असा कोणता चष्मा आहे ? असा संतप्त सवाल राऊतांनी केला.

 

ईडी भाजपची एटीएम मशीन
मी 15 तारखेला ईडीच्या वसुली एजंटची माहिती दिली होती. एकूण 4 अधिकारी असून 5 वा हा किरीट सोमय्या आहे.
ईडीचे मोठे अधिकारी आहेत. एका अधिकाऱ्याने राजीनामा देऊन निवडणूक लढवली.
या अधिकाऱ्याने यूपीमध्ये 50 उमेदवारांचा खर्च केला होता. हा एक मोठा ग्रुप आहे.
ईडी ही भाजपची एटीएम मशीन (ATM Machine) झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अधिकाऱ्यांची काळी यादी पंतप्रधानांकडे
ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपचे एटीएम मशीन झाले आहेत.
या अधिकाऱ्यांची काळी चिठ्ठी मी पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी जे स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan) हे फक्त साफ सफाईसाठी नाही, तर देशात काळा पैसा उभारणाऱ्यांना साफ करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
आम्ही एक पत्र लिहले असून आणखी दहा पत्र लिहिणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | ED becomes ATM For BJP Says Shivsena Leader Sanjay Raut

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनातून बर्‍या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sadabhau Khot | ‘…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावायला कमी करणार नाही’; माजी मंत्र्याचा परिवहन मंत्र्यांना इशारा !

Tips For Asthma Patients | अस्थमाने असाल त्रस्त तर ‘या’ गोष्ठी लक्षात ठेवा, धाप लागण्याच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

 

Related Posts