IMPIMP

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘शिवरायांचा अपमान होऊनही भाजप आणि शिंदे गट मंडळी हात चोळत बसली” – संजय राऊत

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut slams eknath shinde over dharmveer movie says it was not based on anand dighe

मुंबई  : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मागील काळात छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि शिंदे गटाला धारेवर धरले आहे. शिवरायांचा अपमान होऊनही भाजप आणि स्वाभिमानाच्या गोष्टी करणारे शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हात चोळत बसले आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt)

 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या आराध्य दैवतांचा भाजपच्या आराध्य दैवतांकडून सतत अपमान होत आहे. त्यांना वाटत आहे, की हे राजकारण सुरू आहे. तसेच महाराष्ट्रावर कर्नाटककडून अन्याय होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. आम्ही कोणत्याही क्षणी आमची पुढील भूमिका जाहीर करू. शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊनही राज्यातील सरकार, मुख्यमंत्री, शिंदे मंत्रिमंडळ, आमदार, खासदार जे स्वाभिमानाच्या गप्पा मारून शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते आता हात चोळत बसले आहेत. ते किती वेळ हात चोळत आणि तोंड शिवून बसणार आहेत, आम्ही पण पाहतो. आणि राज्यातील जनता देखील पाहत आहे. यांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. यांना तो अभिमान आणि प्रेम नाही. त्यामुळे या सर्वांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही पावले उचलत आहोत, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकरांच्या माफिनाम्याचा उल्लेख केला होता.
त्यावरून हे राजकारण पेटले होते. त्यावेळी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेब बादशहाची माफी मागितली होती,
असे म्हंटले होते. त्यावरून शिवसेना आणि इतर पक्ष आक्रमक झाले आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | sanjay raut criticizes bjp and shinde group over controversial statements made by governor koshyari and sudhanshu trivedi regarding chhatrapati shivaji maharaj

 

हे देखील वाचा :

Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

Pune Pimpri Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, 2 पिस्टल, काडतुसे, कोयते जप्त

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

 

Related Posts