IMPIMP

Sanjay Raut | शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासावर बोलले संजय राऊत; म्हणाले…

by nagesh
 Pune Crime News | Youth in Chandannagar detained in case of MP Sanjay Raut threat case; Pune police handed the youth over to Mumbai police

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आले असता एकत्र प्रवास केला. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. अनेक नेत्यांनी या घटनेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. याप्रकरणी आज दि.९ नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) हे राज्याचे नसून देशाचे नेते आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासोबत प्रवास केला हे कटुता संपवण्याच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल आहे. असे देखील संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, ‘सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे. आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईन असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी मी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत देखील केले होते. महाराष्ट्राच्या ६०-६५ वर्षाच्या राजकीय इतिहासात एवढी टोकाची कटुता, द्वेष, सुडाचे राजकारण हे कधी पहायला मिळाले नाही. राजकीय मतभेद हे होतचं असतात. पण यावर ज्या पध्दतीने महाराष्ट्रात राजकारण होत आहे, ही आपली परंपरा मुळीच नाही. जर देवेंद्र फडणवीस ही राजकीय कटुता संपविण्याचे प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्र नक्कीच त्यांचे स्वागत करील असेही यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात फुटलेली ही विषाची उकळी संपुष्टात आली पाहिजे. असे देखील संजय राऊत म्हणाले.

 

दरम्यान, संजय राऊत यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता त्यावर ते म्हणाले की,
मंत्रीमंडळात बदल करणे हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो.
अनेकदा मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तसेच जर त्यांचा परफॉर्मंस शून्य असेल तर मंत्रीमंडळातून काढलं जात.
मंत्रीमंडळात फेरबदल झाले तरी तेच पत्ते पिसले जातील. महाराष्ट्रातील सरकार मात्र घटनाबाह्य आहे.
लवकरच घटनेचा हातोडा या सरकारवर पडेल. असेही संजय राऊत शिंदे गटावर टीका करत म्हणाले.

काल दि.८ रोजी दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंती समारंभात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्र कार्यक्रमस्थळी आले होते.
त्यावरून राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader sanjay raut reaction on sharad pawar devendra fadnavis travel in one car

 

हे देखील वाचा :

Amitabh Bachchan | महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल ; बिग बींनी चाहत्यांची मागितली माफी

Shripal Sabnis | राज्यपालांवर टीका करताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘नालायक राज्यपाल, अवदसा येऊन…’

Dr Vishwas Mehendale Passed Away | ज्येष्ठ माध्यमकर्मी, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

 

Related Posts