IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका’

by nagesh
Sanjay Raut | opposition mahamorcha sanjay raut on the 17th the mahamorcha will start no- one will be able to stop it sanjay raut

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइनShivsena MP Sanjay Raut | शिवसेनेने (Shivsena) सध्या आक्रमक होत पुन्हा एकदा पक्षसंघटना राज्यात बळकट करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) आणि इतर नेते कामाला लागले असून बैठका, यात्रा, मेळावे यांचा धडाका लावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत सध्या नाशिक दौर्‍यावर असून येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाशिकमध्ये पक्षाच्या मेळाव्यात बंडखोर आमदारांना सुनावताना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना 50 खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील. शिवसेनेसोबत बेईमानी करणे सोपे काम नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना आहे. शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही. शंभर आमदार आणि पंचवीस खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे.

 

संजय राऊत म्हणाले, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातली आणि ते आमचे बाप आहेत. तुम्ही काय हक्क सांगता ? तुम्ही तिथे गेला आहात तर सुखाने राहा शिवसेनेचे नाव कशाला घेता ? शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका.

 

काही दिवसांपूर्वी हनुमानाचे जन्मस्थान कोणते यावरून वाद झाला. पण जगातील सर्व हिंदू धर्माचार्य एकत्र आले आणि त्यांनी सांगितले की हनुमानाचा जन्म नाशिकमध्येच झाला. त्यामुळे हनुमान आणि त्याची गदा ही आपलीच आहे. तसेच शिवसेना ही आमचीच आहे, असे राऊत म्हणाले.

 

बंडखोर आमदारांची पोलखोल करताना ते म्हणाले, हिंदुत्वासाठी किंवा उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली ही कारणे खोटी आहेत. खरी कारणे आता समोर येतील. नाशिकमधील दोन – तीन आमदार गेले आहेत. त्यांची आमदार व्हायची लायकी होती का ? त्यांच्या पाठीशी शिवसेना ही चार अक्षरे नसती आणि शिवसैनिकांनी घाम आणि रक्त आटवले नसते तर नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येणे कठीण होते. पण तुम्हाला आमदार केले.

 

राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन हे सगळे लोक बाहेर पडले. आता आमची शिवसेना खरी असल्याचे ते म्हणत आहे. शिवसेना आमचा पंचप्राण आहे. लाखो शिवसैनिकांचे प्राण तुम्हाला काढून घेता येणार नाहीत. धनुष्यबाण शिवसेनेचाच राहिल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोविड काळात उद्धव ठाकरेंनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे मार्गदर्शन केले. गोदावरीमध्ये गंगा नदीप्रमाणे मृतदेह वाहिले नाहीत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात लोकांचे जीव वाचवले आणि हे म्हणतात उद्धव ठाकरे काम करत नाहीत.

 

भाजपावर (BJP) घणाघात करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात एकदा वणवा पेटला तर विझवताना कठीण जाईल.
एकदा महाराष्ट्र पेटला तर विझत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
भाजपाने शिवसेना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांना सरकार पाडता आले नाही, तेव्हा शिवसेना फोडली, कोट्यवधी रुपये ओतले,
ईडीपासून (ED सीबीआय (CBI) पर्यंत तपास यंत्रणा वापरल्या. शेवटी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले.

 

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा हा भाजपाचा डाव असल्याचे सांगताना राऊत म्हणाले की,
शिवसेनेशिवाय या आमदारांनी विधानसभेत जाऊन दाखवावे. आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत.
आम्ही लालकिल्ल्याला सलाम करत नाही. मुंबई मिळवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आहे.
दिल्लीवाल्यांना आज परत मराठी माणसापासून मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली.

 

बंडखोर आमदार आणि भाजपाचा समाचार घेताना राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, 2014 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने 65 जागा जिंकल्या.
शिवसेना पाच जागासुद्धा जिंकणार नाही असे भाजपा म्हणत होती.
हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री म्हणून यातील बरेच लोक यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते.
तेव्हा यांना हिंदुत्व आठवले नाही का ?

 

2019 साली अमित शाह (Amit Shah) मातोश्रीवर आले असताना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले होते.
पण निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला. तेव्हाही 40 आमदारांपैकी कोणाचाही आत्मा जागा झाला नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut warning to rebel shivsena mlas

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण… – बच्चू कडू

Pune Crime | आई-वडील शाळेत मीटिंगसाठी गेले; मुलीची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Amruta Fadnavis | महाशिवरात्रीला एक गाणे रिलीज झाले, पुढ काय ? अमृता फडणवीस म्हणाल्या…

 

Related Posts