IMPIMP

Shivsena | उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, विदर्भातील ‘हा’ बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra winter session 2022 shivsena uddhav balasaheb thackeray group ousted from list of table chairpersons

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हाताशी घेऊन शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडली. यासाठी
सर्वप्रकारची मदत भाजपाने (BJP) सुरूवातीला पडद्यामागून आणि नंतर उघडपणे केली. यानंतर शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्ता हाती घेतली.
भाजपाने केलेल्या या कृतीला आता शिवसेना (Shivsena) उत्तर देताना दिसत आहे. लवकरच भाजपामधील एक माजी मंत्री शिवसेनेत प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भातील भाजपा नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना 19 ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय देशमुख यांचा यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघात (Digras Constituency) मोठा प्रभाव आहे. देशमुख हे शिंदे गटातील नेते आणि राज्य सरकारमधील वादग्रस्त मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. भविष्यात उद्धव ठाकरे हे देशमुखांच्या माध्यमातून संजय राठोडांना मोठे आव्हान निर्माण करू शकतात. संजय राठोड हे पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरूणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येनंतर चर्चेत आले होते, यानंतर त्यांना मंत्रीपद देखील सोडावे लागले होते.

 

दरम्यान, संजय देशमुख यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
हे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेऊ शकतात.
शिवसेनेतील फुटीनंतर अनेक नेते साथ सोडून जात असताना संजय देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या
नेतृत्वातील शिवसेनेला विदर्भात मोठे बळ मिळू शकते.
संजय देशमुखांचा शिवसेनेतील प्रवेश हा भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shivsena | uddhav thackerays counter attack on bjp blasted former minister of vidarbha sanjay deshmukh will tie shivbandhan on october 19

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची अजित पवारांची माहिती; तर जयंत पाटील म्हणाले सरकार टिकणे कठीण, चंद्रकांत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…

Chandrakant Patil | सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, जर कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढण्याची व्यवस्था सरकारकडे आहे – चंद्रकांत पाटील

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

 

Related Posts