IMPIMP

Maharashtra Congress | काँग्रेसने नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवर दाखल गुन्ह्यांचा विचारला जाब

by nagesh
Maharashtra Congress | Congress should ask about cases filed against Thackeray group leaders by tweeting Narendra Modi's old video

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Congress | नकला केल्याच्या कारणावरुन शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) गटाच्या अनेक नेत्यांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत आहे. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका केल्या जात आहेत. प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करुन एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांवर ठेवला आहे. याच दरम्यान काँग्रेसने (Maharashtra Congress) मोदींचा एक व्हिडिओ ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटातील विनायक राऊत (Vinayak Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून काँग्रेसने (Congress) भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) नकला करत आहेत.

 

 

काँग्रेसचे (Maharashtra Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.
यात त्यांनी भाजपला धारेवर धरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) एक जुना व्हिडीओ शेअर करत पायलट म्हणतात,
भाजपच्या (BJP) शीर्ष नेत्याचे नीट अध्ययन केले असते, तर शिवसेनेच्या भास्कर जाधव आणि इतर नेत्यांवर
गुन्हे दाखल झाले नसते.
नकला आणि कलाविष्कार यातील फरक समजण्यासाठी मोदीजींचा कलाविष्कार पाहणे गरजेचे आहे.
सदर व्हिडीओत नरेंद्र मोदी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नक्कल करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Congress | Congress should ask about cases filed against Thackeray group leaders by tweeting Narendra Modi’s old video

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

Vinayak Raut | खोके घेतले नाहीत म्हणून चौकशी, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Chandrashekhar Bawankule | पंजा आणि घड्याळाच्या हातात असलेली मशाल आम्ही विझवणार – चंद्रशेखर बावनकुळे

 

Related Posts