IMPIMP

Supriya Sule | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, ‘आपसे ये उम्मीद न थी….’

by nagesh
 Supriya Sule | supriya sule for agitation in pune comment on crime in pune and criticize devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Supriya Sule | काल (दि.२४) मुंबईत एका वृत्तवाहिनीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक खळबळजनक दावा केला होता. मुंबईचे तत्कालिन सीपी संजय पांडे (CP Sanjay Pande) यांना महाविकास आघाडी (MVA) सरकारने माझ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची सुपारी दिली होती. असा खळबळजनक दावा केला होता. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यातील हिंजवडी येथे स्ट्रॉबेरी शेती पाहण्यासाठी सुप्रिया सुळे या हिंजवडीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल उत्पादक शेतकरी मल्हार साखरे यांची पाठ थोपटली. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्याचा कसून समाचार घेतला.

 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, ‘देवेंद्र फडणवीस यांचे हे विधान हास्यास्पद आहे.
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत.
देवेंद्र जी आपस ये उम्मीद न थी! अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशा परिस्थितीवर त्यांनी बोलावे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर मला आश्चर्य वाटले आहे. नागरिकांची सुरक्षा करणे याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे.’ असे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

तर चिंचवड पोटनिवडणुकीवर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
‘चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल.
अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून दोन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
भाजप कोणाला उमेदवारी देणार आहे हे माहित नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तसेच बिनविरोध निवडणुकीबाबत मी तर्कवितर्क लावू शकत नाही. असंही यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Supriya Sule | supriya sule reaction on devendra fadanvis allegations against mahavikas aghadi

 

हे देखील वाचा :

President’s Police Medal | मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

Nandurbar Crime News | नंदुरबारमध्ये ‘पुष्पा’ स्टाईलने सागाची तस्करी; जमिनीखाली गाडली होती सागाची लाकडे

Pune Crime News | 500 रुपयासाठी व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे जिल्ह्यातील घटना

 

Related Posts