IMPIMP

Uddhav Thackeray | अदानींपाठोपाठ अंबानीपुत्र ‘मातोश्री’वर, नेमकं काय शिजतंय?

by nagesh
 Uddhav Thackeray | anant ambani met uddhav thackeray discussed for almost 3 hours

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची त्यांच्या राहत्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट घेतली. यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी देखील उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

 

तर दुसीरकडे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप (BJP) शिंदे यांचे संबंध वाढत आहेत. मनसेतर्फे शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दीपोत्सव कार्यक्रम (Deepotsav Program) आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे राजकारणात दोनही बाजूंना नेमकी काय डाळ शिजत आहे, याचा अंदाज येत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात गेले अनेक दिवस मोठी राजकीय खलबते होत आहेत. प्रथम शिवसेनेत बंड झाले आणि त्यानंतर बंडखोर आमदारांच्या गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस यांच्यात जवळीक वाढत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे भाजप युतीची शक्यता आहे.

 

अनंत अंबानी (Anant Ambani) शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर ते रात्री साडेअकरा वाजता तिथून बाहेर पडले.
त्यामुळे त्यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झालेली दिसते. त्यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र, आता मोठ्या उद्योदगपतीचा मुलगा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | anant ambani met uddhav thackeray discussed for almost 3 hours

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पेट्रोल चोरीचा आरोप केल्याने तरुणावर कोयत्याने वार; चौघांविरुद्ध FIR

Maharashtra Police Recruitment | बेरोजगारांसाठी खुशखबर! राज्यात 18 हजार जागांसाठी लवकरच पोलीस भरती, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा

 

Related Posts