IMPIMP

Uddhav Thackeray on Raj Thackeray | ‘राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत’; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका!

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt maharashtra political crisis the last mla had an offer but mns leader amey khopkar slams shivsena

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदूत्त्वाचा मुद्दा पकडत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) घेतलेल्या दोन्ही सभांमध्ये शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला (NCP) लक्ष्य केलं होतं. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray on Raj Thackeray) निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे (Uddhav Thackeray on Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज ठाकरे ही भाजपची ‘बी’ टीम नाहीतर ‘ढ’ टीम आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुन्नाभाई’ चित्रपटामध्ये (Munnabhai Movie) गांधीजी वाचून आपण गांधीजींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. त्याप्रमाणे राज ठाकरे हे आपण बाळासाहेब ठाकरे आहोत असे समजू लागले असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

अयोध्येमध्ये (Ayodhya) श्रीरामाचं मंदिर (Shriram Temple) व्हावे यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी मनसे काय करत होती?, बाबरी मशिद प्रकरणावेळी (Babri Masjid case) राज ठाकरे कुठे होते?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांंनी खासदारांची बैठक घेतली होती त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीमध्ये, सरकारची काम जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, मनसे पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधलेला असून त्यांची बेगडी रूप लोकांना दाखवून द्या, असं असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Uddhav Thackeray on Raj Thackeray | cm uddhav thackeray allege raj thackeray feel himself as balasaheb thackeray

 

हे देखील वाचा :

Akola Juvenile Correctional Institution | अकोल्याच्या बालसुधारगृहातून 7 मुली पळाल्या; 2 मुलींचा लागला शोध

Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni | महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांची निवड

Kangana Ranaut Lady Boss Look | कंगना रनौतच्या लेडी बॉस लूकनं इंटरनेटवर लावली आग, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष..

 

Related Posts