IMPIMP

Uddhav Thackeray | राष्ट्रीय पातळीवर पोहचण्यासाठी शिवसेनेचा नवा प्लॅन? उद्धव ठाकरे भिडणार थेट नरेंद्र मोदींना?

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray will stand against narendra modi for 2024 election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन सध्या शिवसेनेतील (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदे गटाकडून (Eknath Shinde) बरेच प्रयत्न होताना पहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात तर अशीच चर्चा आहे की याला भाजपची (BJP) फूस आहे. मात्र तरीही या परिस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून जिकरीचा लढा उभारुन संपूर्ण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यासाठी ठाकरे गटाकडून एक खास प्लॅन देखील तयार करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आगामी 2024 च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच शिवसेनेला महाराष्ट्रात भाजपने फोडून मोठं भगदाड पाडलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे येत्या काळात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP chief Sharad Pawar), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या लीगमध्ये दिसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना प्रमुख विरोधी नेता बनवण्याची योजना असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

 

भाजपच्या कार्यशैलीचा ‘बळी’ म्हणून येत्या काळात उद्धव ठाकरे यांना दाखवण्याची योजना आखण्यात आल्याचे समजते. यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात राष्ट्रीय स्तरावर (National Level) प्रमुख विरोधी पक्षनेते म्हणून जागा घेण्याची शक्यता आहे. दिल्लीकरांशी दोन हात करत असताना उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील लोकांची अभूतपूर्व सहानुभूती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

भाजप आणि शिवसेना या दोन्ही हिंदुत्ववादी संघटना आहेत. त्यातच उद्धव ठाकरे हे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांचे चिरंजीव आहेत.
त्यामुळे हिंदुत्वाचे प्रखर विचाराचे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते.
2024 ची निवडणूक जर हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावर लढवण्याचे ठरले तर उद्धव ठाकरे हे त्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतात.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा व्हिक्टिम कार्ड म्हणून वापर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना यामध्ये किती यश येते हे आगामी काळात पाहायला मिळेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray will stand against narendra modi for 2024 election

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | चालत्या बसमधून डोके बाहेर काढणे बेतलं जिवावर, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Sanjay Raut | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना दिलासा नाहीच; कोठडीत पुन्हा वाढ

Shivsena | हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावले, आमदार रवी राणा यांची टीका

 

Related Posts