IMPIMP

WhatsApp Double Verification Code | WhatsApp होणार आता आणखी सुरक्षित, डबल व्हेरिफिकेशनसह मिळेल Undo चे ऑपशन

by nagesh
Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp Double Verification Code | व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सुरू झाले तेव्हा फक्त मेसेजप्रमाणे चॅट करता येत होते. फरक एवढाच होता की त्यामध्ये लास्ट सीन आणि ऑनलाइन पाहण्याचा ऑपशन होता. पण कालांतराने ते अपडेट होत गेले आणि त्यात अनेक नवीन फिचर्स जोडण्यात आले. (WhatsApp Double Verification Code)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आता व्हॉट्सअ‍ॅप इतके अपडेट झाले आहे की अनेक अ‍ॅप्सचे काम एकट्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केले जाते. वैशिष्ट्य वाढल्याने धोकेही वाढले. अशा वेळी व्हॉट्सअ‍ॅप आता लॉग इन करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे.

 

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये लॉग इन करताना सुरक्षिततेसाठी एक अतिरिक्त फीचर दिले जाईल. हे नवीन फीचर अँड्राईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे फीचर कसे काम करेल ते जाणून घेवूयात…

 

खरं तर, व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की आता युजरला अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी डबल व्हेरिफिकेशन कोड मिळेल. त्यानुसार आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी एक नवीन फीचर विकसित करत आहे, ज्यामध्ये डबल व्हेरिफिकेशन कोड मागत आहे. (WhatsApp Double Verification Code)

 

जेव्हा हे फीचर बीटा टेस्टरसाठी जारी केले जाईल, तेव्हा इतर कोणत्याही डिव्हाइसवरून व्हॉट्सअ‍ॅप खात्यात लॉग इन करण्याचा कोणताही यशस्वी प्रयत्न व्हेरिफाय अतिरिक्त व्हेरिफिकेशन कोड आवश्यक असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रजिस्टर मोबाईल क्रमांकावर अ‍ॅटोमॅटीक कोड
खरे तर, व्हॉट्सअ‍ॅपला डबल व्हेरिफिकेयल कोडसह लॉगिन प्रक्रिया अधिक सुरक्षित बनवायची आहे जेणेकरून खाते आणि वैयक्तिक तपशीलांचा गैरवापर टाळता येईल.

 

जेव्हा तुम्ही नवीन फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन कराल तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबरवर सहा अंकी अ‍ॅटोमॅटीक कोड पाठवला जाईल.

 

पाठवणार अलर्ट
रिपोर्टनुसार, जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी होईल,
तेव्हा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी 6-अंकी कोडची आवश्यकता असेल.
अशा परिस्थितीत, फोन नंबरच्या मालकाला त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याच्या प्रयत्नाबद्दल अलर्ट करण्यासाठी दुसरा मेसेज पाठविला जाईल.

 

या प्रकरणात यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅपवरून कळेल की कोणीतरी त्याच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करीत आहे
आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो दुसरा व्हेरिफिकेशन कोड सामायिक करणार नाही.

 

या प्रकरणात पहिले मेसेजिंग अ‍ॅप बनले
व्हॉट्सअ‍ॅपची ही प्रक्रिया सध्या विकासाच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
जर व्हॉट्सअ‍ॅपने हे नवीन फीचर आणले, तर व्हॉट्सअ‍ॅप हे डबल व्हेरिफिकेशन लॉगिन प्रोसेसचे पहिले मेसेजिंग अ‍ॅप असेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Undo ऑपशन
रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी Undo ऑपशन देखील आणत आहे.
ज्यांना मेसेज डिलीट केल्यानंतर तो पूर्ववत करायचा आहे त्यांच्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरेल.

 

रिपोर्टनुसार, जेव्हा एखादा यूजर Delete For Me पर्याय निवडतो तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवर अन-डू हा पर्याय दिसेल. Gmail मध्ये देखील Undo फीचर आहे.

 

जर तुम्ही एखादा मेल डिलीट केला आणि लगेच तुम्हाला वाटले की तुम्ही तो मेल चुकून डिलीट केला आहे,
तर अन-डू चा पर्याय येतो. अन-डू निवडल्यानंतर, तुम्हाला तो मेल परत मिळतो.

 

Web Title :- WhatsApp Double Verification Code | whatsapps security will now more stronger double verification code for log in undo will also be an option

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी?; राजकीय हालचालींना वेग

HDFC Bank Hike MCLR | ‘या’ खासगी बँकेचा कर्जदारांना झटका ! RBI च्या पतधोरणाआधीच कर्जदर वाढवला

Pune Crime | कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! पत्नीचा मृत्यू तर सासू गंभीर जखमी, शिरुरमध्ये प्रचंड खळबळ

 

Related Posts