IMPIMP

Amazon चा भारतातील लहान उद्योजकांसोबत पक्षपाती व्यवहार, धक्कादायक माहिती आली समोर

by sikandershaikh
Amazon-owner

नवी दिल्ली : वृत्त संस्थाई-कॉमर्स क्षेत्रातील अमेझॉन (amazon) या बलाढ्य जागतिक कंपनीने आपण सर्व उद्योजकांना समान वागणूक देत असल्याचा दावा करत असते. मात्र, प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच आहे. अमेझॉनने भारतातील लहान उद्योजकांबाबत पक्षपाती व्यवहार करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

भारताने  2019 मध्ये एफडीआय अर्थात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा स्वीकार केला होता. मात्र अमेझॉन (amazon) कंपनीला आपल्या उद्योगाला यापासून धोका आहे असे वाटल्याने एप्रिल 2019 मध्ये  अमेझॉनचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी जय कार्ने यांची भारताच्या अमेरिकेतील राजदूतासोबत वॉशिंग्टन येथे एक बैठक झाली होती. बैठकीआधी अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी जय यांच्यासाठी एक नोट तयार केली. यात जय यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये याबाबत लिहले होते.  त्यात म्हटले होते की, जय यांनी हे सांगावे की कशा पद्धतीने अमेझॉन भारतात 550 कोटी डॉलर्सचा व्यवसाय आणण्यासाठी कटिबद्ध आहे.

पण जय यांना बजावल गेले होते की, त्यांनी एक तथ्य अजिबात उघड करू नये. ते म्हणजे अमेझॉनच्या वेबसाईटवर विकल्या गेलेल्या एकूण मालांपैकी एक तृतीयांश माल हा केवळ 33 कंपन्यांनी विकलेला आहे. ही माहिती या नोटमध्ये संवेदनशील/उघड करण्यासाठी नाही या शीर्षकाखाली दिली होती.  इतरही काही वादग्रस्त माहिती या रॉयटर्सला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये आहे. मात्र जय यांनी भारतीय राजदूतांना काय सांगितले हे पुरेसे स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे भारतात सध्या एडीद्वारे अमेझॉनची चौकशीही सुरू आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप अमेझॉनवर आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

त्या नोटमधील ही सगळी माहिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील होती.
ती उघड झाली असती तर मोठ्या वादाला तोंड फुटले असते.
अमेझॉनने (amazon) भारतात सतत आपला सार्वजनिक चेहरा सादर करत आले आहे.
आम्ही लहान उद्योजकांना सतत प्रोत्साहन देतो आणि त्यांना मोठ करण्याचा हा हेतू आहे.
मात्र यातून अमेझॉनच पितळ उघड झाल असते.
आधीच भारतातील लहान उद्योजकांकडून आक्षेप घेतला जातो की, अमेझॉन खूप जाचक अटी आणि
निर्बंध लादत त्यांच्या व्यवसायाला नुकसान पोहचवत आहे आणि मोठ्या ब्रँड्सना अमेझॉन विशेष वागणूकही देत आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ही बाब खटकली असती.
कारण त्यांनी आपली राजकीय बांधणी याच सगळ्या लहान व्यावसायिकांच्या जोरावर केली आहे.

Related Posts