IMPIMP

Indian Railways कडून दरमहा लाखो रुपये कमावण्याची संधी ! फक्त करा ‘हे’ काम, जाणून घ्या

by pranjalishirish
Indian Railways | indian railways rule railway ban carry flammable goods and smoking and during travel irtct news in marathi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – तुम्ही आता भारतीय रेल्वे (Indian Railways) सोबत मिळून पैसे कमावू शकता. इतकंच नाही तर यात तुम्हाला कमी भांडवलात बंपर नफा मिळू शकतो. भारतीय रेल्वेनं आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) अंतर्गत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आपला भागीदार होण्याची संधी दिली आहे. तुम्ही देखील या संधीचा लाभ घेऊ शकता. रेल्वे सोबत मिळून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

रेल्वे प्रॉडक्ट विकून करा कमाई

रेल्वेकडून Indian Railways दरवर्षी 70000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे प्रॉडक्ट्स खरेदी केले जातात. यात टेक्निकल आणि इंजिनियरींग प्रॉडक्टसह रोजच्या वापरातील विविध प्रॉडक्ट्स आहेत.

व्यवसायासाठी असं करा रजिस्ट्रेशन

जर तुम्हाला रेल्वे Indian Railways सोबत व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही https://ireps.gov.in/ आणि https://gem.gov.in/ या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता.

असा करू शकता व्यवसाय

– बाजारात स्वस्त वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून रेल्वेकडून Indian Railways प्रॉडक्ट खरेदी करण्यात येतात. तर अशा स्थितीत तुम्हाला असे प्रॉडक्ट्स निवडावे लागतील जे तुम्ही कोणत्याही कंपनीकडून स्वस्तात खरेदी करू शकता.

– यानंतर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर तयारी करावी लागेल. याची मदत तुम्हाला रेल्वेच्या https://ireps.gov.in/ आणि https://gem.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन टेंडर पाहण्यासाठी होईल.

– टेंडर अपलोड करताना भांडवल आणि नफा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच आधारे टेंडर भरा.

– याशिवाय हे लक्षात ठेवा की, जर तुमचे दर स्पर्धात्मक असतील तर टेंडर मिळवणं तुमच्यासाठी सोपं जाईल. सेवेच्या पुरवणठ्यासाठी रेल्वेनं काही तांत्रिक पात्रतेची मागणी केली आहे.

रेल्वेनं MSME प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे

रेल्वेनं MSME प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या कोणत्याही टेंडरच्या खर्चाच्या 25 टक्क्यांपर्यंत खरेदीत एमएसएमई ला 25 टक्क्यांपर्यंत प्राधान्य मिळेल. तसंच छोट्या उद्योगांना वारसा ठेव रक्कम आणि सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटींमधून सूट देण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही

जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा तम्ही रेल्वेच्या दुसऱ्या एजन्सीमध्ये प्रॉडक्ट्स पुरवण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही रेल्वे सोबत व्यवसाय सुरू करू शकता.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts