IMPIMP

आता ‘या’ बँकेतून काढता येणार केवळ 1000 रुपये; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

by sikandershaikh
Recurring Payments | reserve bank of india hikes limit on auto debits from debit credit cards sans otp to rs 15000

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi) आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. कर्नाटकमधील डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह या बँकेवर काही निर्बंध लादण्यात आले असून बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांना आपल्या बचत खात्यातून केवळ १००० रुपये काढता येणार आहे तसेच बँकेला नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवी स्वीकारण्यावर रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सहकारी बँकेला नवीन गुंतवणुकीवर बंदी घातली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना सूचना दिल्याच म्हटलं आहे.

प्रसिद्धिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, बँकेची स्थिती पाहता ठेवीदारांना बचत आणि चालू खात्यांमधून एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार नाही. बँकेने ग्राहकांना कर्जाबाबत देखील माहिती दिली असून त्यासाठी काही अटी असल्याचं म्हटलं आहे. नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण ९९.५८ टक्के ठेवीदार ठेवी विमा आणि कर्ज हमी कॉर्पोरेशन विमा कॉर्पोरेशन (डीसीजीसी) योजनेंतर्गत आहेत.

बँकेवर निर्बंध लादले म्हणजे बँक परवाना रद्द केला असा होत नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. जारी केलेल्या निर्देशानुसार, आर्थिक परिस्थिती बँकेची सुधारण्यासाठी बँक मदत होईल आणि व्यवहार सुरू राहतील. १९ फेब्रुवारी २०२१ ला हा नियम जारी करण्यात आला असून सहा महिने लागू राहणार आहे. गेल्या वर्षांपासून सर्वच सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या आहेत याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

नोट फाटली तरी मिळणार पैसे, काय आहे नियम

आपल्याकडून अनेक वेळा देवाण घेवाण करताना चुकुन नोट फाटली जाते.
त्यानंतर ती कोणीही घेत नसल्याने पैसे वाया गेल्याचा अनेकांचा समज आहे.
मात्र जुन्या किंवा फाटलेल्या नोटा या रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेता येतात.
कधी कधी फाटलेल्या नोटेचा अर्धा भागच शिल्लक राहतो पण असं असलं तरी तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून (rbi) पैसे मिळवू शकता.
तुमच्याकडे नोटेचा जितका भाग असेल त्याप्रमाणात रिझर्व्ह बँक पैसे परत देते.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेलाही किंमत आहे. मात्र प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे.
रिझर्व्ह बॅंकचे वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार १ ते २० रुपयाची नोट अर्धवट फाटली असेल तर त्याचे पूर्ण मूल्य दिले जाते.
पण ५० रुपये ते २००० रुपयांच्या नोटा फाटल्या असतील तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळू शकते.

Related Posts