IMPIMP

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

by nagesh
Corona in Mumbai | corona to 172 officers and employees of mumbai municipal corporation BMC

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमुंबई मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona in Mumbai) संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सुमारे 6 हजार 900 कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाले होते. यामध्ये 100 पेक्षा अधित जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दुसऱ्या लाटेनंतर मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून मुंबईत नवीन रुग्णांची संख्या (Corona in Mumbai) झपाट्याने वाढत आहे. यामध्ये महापालिका कर्मचारी (BMC Employee) व अधिकारी (Officers) मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधीत होत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईत कोरोनाच्या (Corona in Mumbai) तिसऱ्या लाटेत 17 डिसेंबरपासून आतापर्यंत 172 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्यासह नगरसेवक (Corporator) व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

मुंबई महापालिकेमध्ये मार्च 2020 पासून आतापर्यंत 7 हजारापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी यांना कोरोनाची लागण (Corona Infection) झाली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांसह वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठांमध्ये उपायुक्त पदावरील चार अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. तसेच महापालिका हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी देखील बाधित झाले आहेत.

 

 

Web Title : Corona in Mumbai | corona to 172 officers and employees of mumbai municipal corporation BMC

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेचा जागीच मृत्यु

Homemade Face Packs | ब्युटी पार्लर बंद? घरच्या घरी मिळवा एकदम चमकदार त्वचा, लग्नामध्ये दिसाल सर्वात सुंदर

 

Related Posts