IMPIMP

Mumbai Unlock | मुंबईकरांना आणखी दिलासा ! आजपासून मैदाने, उद्याने, चौपाट्या मुंबईकरांसाठी खुले, BMC चा निर्णय

by nagesh
mumbai unlock guidelines maharashtra unlock relaxation in corona restriction since today mumbai municipal corporation

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Unlock | राज्यात कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती देखील आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) सामान्य प्रवाशांसाठी 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेन (Mumbai local train) सुरु करण्याचा निर्णय घेतला. यांनतर आता मुंबई पालिकेने (BMC) देखील सोमवारपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु केली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी सुरु करण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं (BMC) घेतला आहे. यावरून मुंबईकरांना आणखी दिलासा (Mumbai Unlock) देण्यात आलाय. परंतु, यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य उपाययोजनांचे नागरिकांना काही नियमांचं बंधन देखील घातलं गेलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुंबईकरांना दिलासा दिला असला तरी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं महापालिकेनं
(BMC) सांगितलं आहे.
दरम्यान, मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची वाढ आणि कोरोना मृत्युदरात घट दिसून आली आहे.
मुंबईमधील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्याकडून याबाबत आज आदेश जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुबईतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. यामुळे ‘ब्रेक द चेन’
(‘Break the chain’) अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता आणली जात असल्याचं मुंबई महापालिकेने (BMC) सांगितले आहे.
याचबरोबर तेथील मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहणार आहेत.
मात्र, यांसाठी विविध नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच, घालून दिलेले निर्बंध पाळणे मुंबई नागरिकांना बंधनकारक असणार आहे.
या दरम्यान, 2 डोस (2 doses) घेतलेल्या आणि 14 दिवस उलटून गेलेल्या सामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलीय.
म्हणून 11 ऑगस्टपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination certificate) पडताळणी सुरू केलीय. यासाठी मदत कक्ष देखील सुरु केला आहे.

Web Title : mumbai unlock guidelines maharashtra unlock relaxation in corona restriction since today mumbai municipal corporation

हे देखील वाचा :

PM Modi | ‘या’ 6 सरकारी योजनांवर PM मोदींची ‘नजर’, 2024 च्या अगोदर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे ‘लक्ष्य’

Pune Crime | बायकोला शिवीगाळ करणे ज्येष्ठाला पडले महागात; शेजार्‍यानं 2 दात पाडले, जाणून घ्या प्रकरण

MoRTH | केंद्र सरकारने बदलले बाईक चालवण्याचे नियम, जाणून घ्या आता मोटरसायलवर मागे कसे बसायचे

Related Posts