IMPIMP

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत कोकणात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह पुण्याला इशारा

by nagesh
Rain in Maharashtra | Warning of heavy rains in Konkan in next 24 hours; Warning to Pune including Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) मागील 2 दिवसांत जोरदार पावसाने धरणे तुडुंब झाली आहेत. राज्याला दिलेल्या पावसाच्या तडाख्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज (बुधवारी) मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात (Marathwada and Central Maharashtra) पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी पुढील 24 तासांत (24 hours) कोकणात (Konkan) अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (rainfall in konkan) इशारा हवामान खात्याकडुन (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मागील आठवड्यापासून राज्यात (Rain in Maharashtra) पावसाने गती घेतली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तसेच काही जिल्ह्यात जोरदार पावसाने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. आज हवामान खात्याकडून एकूण 15 जिल्ह्यांना अलर्ट (Alert to 15 districts) जारी करण्यात आला आहे. यात पालघरला रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या 6 जिल्ह्यांना हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे. या ठिकाणी येत्या काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

मुंबईसह पुणे, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव औरंगाबाद आणि जालना या 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी काही तासात कोकणात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा आणि आकाशात विजा चमकत असताना, मोठ्या झाडाखाली थांबू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | Warning of heavy rains in Konkan in next 24 hours; Warning to Pune including Mumbai

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | BJP खासदाराच्या सुनेला मारहाण; सुनेच्या मदतीसाठी धावल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर

MP Sambhaji Raje | खा. संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले – ‘…तर त्याला मी जबाबदार राहणार नाही’

Nandurbar News | अर्ध्यावरच प्रवास थांबला ! दरड कोसळल्याने घाट बंद, उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन जात असताना पत्नीचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू

 

Related Posts