IMPIMP

18000 ची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत

by nagesh
Police constable caught taking bribe of Rs 18,000, anti-corruption team arrest him

दोंडाईचा : सरकारसत्ता ऑनलाइन – दोंडाईचा येथील पोलीस हवालदाराला 18 हजाराची लाच (bribe) घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने मंगळवारी (दि. 25) रात्री दहाच्या सुमारास पोलीस ठाण्यातच ही कारवाई केली. त्याच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ED कडून निकटवर्तीयाच्या घरावर छापा

विजय शंकरराव मोरे (वय 50) असे लाचखोर bribe पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रामी येथील तक्रारदार योगेश संतोष कोळी व त्याचा नातेवाईक विरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल न करता ब वर्गात समरी पाठवावी, या साठी 20 हजार द्यावेत, अशी मागणी आरोपी मोरे यांनी केली होती. तडजोडीनंतर 18 हजार देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास पोलीस ठाण्याच्या मागील रिकाम्या खोलीत 18 हजाराची लाच bribe स्विकारताना पोलीस हवालदार विजय मोरे यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्याच्यावर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Also Read :

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Related Posts