IMPIMP

Vastu : घरातील कोणत्या दिशेला असावी तिजोरी ? तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना !

by sikandershaikh
tijori

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाvastu which direction | घरात वापर होणाऱ्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवणे गरजेचे असते. त्याचा फायदाही चांगला होता. त्याबाबत ज्योतिष्याने सांगितले, की जर घरात चुकीच्या दिशेला वस्तू ठेवल्या तर हा वास्तू दोष असेल. यातून घरात मोठी अडचण होऊ शकते.

…तर जाणून घेऊया घराच्या दिशेचा योग्य वापर कसा करता येऊ शकतो…

उत्तर दिशा – वास्तूनुसार, घराच्या उत्तर दिशेला भगवान कुबेर यांचे स्थान मानले जाते. त्यामुळे या दिशेत तिजोरी किंवा कपाट ठेवणे शुभ मानले जाते. याशिवाय कोणत्याही वस्तू या ठिकाणी ठेऊ नये.

पूर्व दिशा – वास्तूनुसार, पूर्व दिशेच्या स्वामी सूर्य देव आणि इंद्र देव असतात. त्यामुळे ही जागा नेहमी खाली ठेवावी. नवीन घराची बांधणी करणाऱ्यांनी सूर्य किरणे येतील, अशा स्वरूपात मांडणी करणे गरजेचे आहे.

दक्षिण दिशा – घराच्या दक्षिण दिशेत नेहमी अवजड सामान असायला हवे. ही जागा रिकामी नसावी आणि इथं टॉयलेट किंवा बाथरूममध्येही बनवू नये. यामुळे घराची सुख-शांती भंग होऊ शकते.

पश्चिम दिशा – बाथरूम किंवा टॉयलेट बनवण्यासाठी ही दिशा सर्वात योग्य मानली जाते. तुम्ही या दिशेत किचनही बनवू शकता.

ईशान्य दिशा – ईशान्य दिशेला भगवान शिवस्थळ मानले जाते. त्यामुळे या दिशेत पूजा घर बनवावे. या दिशेचा स्वामी गुरुला मानले जाते.

Related Posts