IMPIMP

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

by pranjalishirish
Uddhav Thackeray | baramati cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अनेक नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यावर भाजपने BJP  सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, जनतेच्या हितासाठी पाच प्रश्नांची उत्तर द्यावीत, अशी मागणी केली आहे. या प्रश्नांची सरबत्तीच भाजपने ट्विटवरून केली आहे.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार, ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू केली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहारांवर निर्बंध लावले आहेत. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपने BJP सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, त्यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हटले आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारला सवाल केले आहेत.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार ? रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार, कमाईची व्यवस्था ? या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का ? रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का ? पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही, याची हमी सरकार देईल का ?’.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विविध मुद्यांवरून घेरणाऱ्या भाजपने BJP राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या निर्बंधावर पाठिंबा दिला आहे. मात्र, काही प्रश्न उपस्थित केल्याने आता या प्रश्नांची उत्तरे ठाकरे सरकारकडून मिळतात का ? हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

Related Posts