IMPIMP

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

by pranjalishirish
bjp leader prasad lad criticized shiv sena over sachin vaze case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद झालेल्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडताना दिसत आहेत. एनआयएने तपासाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा उलघडा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा शिवसेना Shiv Sena  आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

उद्योगपती मुकेश अंबानी आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएने सुरु केला आहे. एनआयएच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सचिन वाझे याने मिठी नदीत काही पुरावे नष्ट करण्यासाठी टाकले होते. एनआयएने मिठी नदीत पुराव्यांचा शोध घेतला असता वाझे याने नदीत टाकलेले काम्प्युटरचा सीपीयू, हार्डडिस्क, खोट्या नंबर प्लेट्स अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. यावरुन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन शिवसेनेवर Shiv Sena  हल्लाबोल केला आहे.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

म्हणून मिठी नदी साफ केली नाही

प्रसाद लाड म्हणाले, इतके दिवस मिठी नदी स्वच्छ का केली जात नव्हती, याचा खुलासा आता झाला आहे. मिठी नदीत सचिन वाझे यांनी फेकलेले डीव्हीआर, सीपीयू सापडल्यानंतर शिवसेनेचे  Shiv Sena पाप जनतेसमोर आले आहे. शिवसेनेनं आपलं पाप समोर येऊ नये म्हणून मिठी नदी साफ केली नाही. हे पुरावे सापडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यी अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे.

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

दरम्यान, मिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने एनआयएकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. तब्बल चार तास ही शोधमोहीम सुरु होती. मिठी नदीतून एक लॅपटॉप, दोन कॉम्प्युटर, एक डीव्हीआर, एक हार्डडिस्क, एक प्रिंटर, दोन नंबर प्लेट्स सापडल्या आहेत.

Also Read

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

शरद पवार आणि अमित शहांची बहुचर्चित भेट ? 2 दिग्गज नेत्यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ! कोण काय म्हणाले ? जाणून घ्या

Related Posts