IMPIMP

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

by pranjalishirish
bjp nitesh rane says welcome high court decision and demands home minister resign as early as possible

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Param Bir Singh  यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या संदर्भात परमबीर सिंह  Param Bir Singh यांनी मुंबई उच्च न्यायालयात  High Court याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (सोमवार) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

मुंबई उच्च न्यायालायने  High Court  याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

गृहमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा

आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाच्या High Court  सुनावणीनंतर ट्विट करुन म्हटले आहे की, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. गृहमंत्र्यांनी पदावर असताना सीबीआय चौकशीला सामोरे जाता कामा नये. त्यामुळे शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वसुली प्रकरणाचा उल्लेख केला होता, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

मुख्यमंत्र्यांनी एक अवाक्षरही काढले नाही

नितेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अवाक्षरही काढले नाही की, कारवाई केली नाही. सीबीआयने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीच चौकशी का केली नाही, याचाही तपास केला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

 

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Related Posts