IMPIMP

Chandrakant Patil : ‘ही वेळ राजकारणाची नाही अन्यथा…’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil slam mva government said union government gave money during corona time

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही धडाडीने काम करत आहेत. मात्र, राज्य सरकार खोटे आरोप करून जनतेला वेडे बनवत आहे. राज्य सरकार केंद्रावर खोटे आरोप करत आहे. मात्र, ही वेळ राजकारणाची नाही. अन्यथा, आम्हीही राजकारणात माहीर आहोत’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Video : 48 तास उलटले, कुठंय ‘त्या’ 16 कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा – किरीट सोमय्या

राज्यात कोरोना परिस्थिती बिकट बनत आहे. अनेक वैद्यकीय सेवांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही धडाडीने काम करत आहेत. मात्र, राज्य सरकार खोटे आरोप करून जनतेला वेडे बनवत आहे. केंद्राकडून सर्वाधिक लशी मिळूनही लशींचा तुटवडा असल्याचे आरोप राज्याने केला आहे. गुजरातच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘रेमडेसिव्हिर’बाबत जे आदेश दिले, तेच आदेश महाराष्ट्रानेही दिले आहेत’.

देवेंद्र फडणवीसांना अटक करा, राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

तसेच ‘राज्यात इंजेक्शन, ऑक्सिजन उपलब्ध नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून उद्योजकांना भेटत नाहीत. निर्णय घेत नाहीत. काहीही प्रयत्न करत नाहीत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती राज्य सरकारच्या हाताबाहेर जात आहे. राज्य सरकार फक्त केंद्रावर खोटे आरोप करत आहे. मात्र, ही वेळ राजकारणाची नाही. अन्यथा, आम्हीही राजकारणात माहीर आहोत, असेही पाटील Chandrakant Patil म्हणाले.

राज्यात रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय राऊतांचे भाष्य, म्हणाले- ‘…तर त्यांनाही श्रेय घेता आलं असतं’

खुशाल गुन्हे दाखल करा
भाजपला श्रेय मिळू नये म्हणून 60 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची सोय होत असताना संबंधित पुरवठादारालाच ताब्यात घेतले. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. असे असेल तर सरकारने खुशाल गुन्हा दाखल करावा, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Also Read :

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

 

Related Posts