IMPIMP

Narayan Rane । मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच नारायण राणेंनी पहिल्याच दिवशी सुनावलं अधिकाऱ्यांना

by bali123
BMC Vs Narayan Rane | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) second notice to bjp leader narayan rane for adhish bungalow in mumbai

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Narayan Rane  | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कालच विस्तार झाला. (Modi Cabinet expansion) यानंतर अनेक नव्या मंत्र्यांना पद वाटप करण्यात आले. आज सर्व मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला. भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणेंनी (Cabinet Minister Narayan Rane) आज लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. प्रथमच राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर आज नारायण राणेंनी (Cabinet Minister Narayan Rane) पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारता दरम्यान अधिकाऱ्यांना (Officer) चांगलच झापलं आहे. यावरून आता दिल्लीत चांगलीच चर्चा सुरु झालीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काल मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी आज सकाळीच मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. आपला पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे हे कामाला लागले आहेत. त्याचवेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. परंतु अधिकारी वर्ग बैठकीदरम्यान तयारी करून आले नसल्याने राणेंनी आपल्या सर्व स्टाफला (Staff) बाहेर काढून मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा क्लास घेतला.

बैठकीदरम्यान नारायण राणेंनी मंत्रालयात (Ministry) किती अधिकारी अनुपस्थित आहे याची माहिती मागितली. त्यावेळी म्हणाले, ‘मी मंत्रालयात पदभार घ्यायला येणार आहे हे माहीत असताना देखील तयारी का केली नाही’, असा करकरीत सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी राणेंनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी बैठकीला येताना नोट सोबत आणावे असं देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. साधारण एक तासाच्या बैठकीत 30 मिनिट अधिकाऱ्यांची नारायण राणेंनी झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Cabinet Minister Narayan Rane । during the 30 minute meeting cabinet minister narayan rane slapped the officers and staff

Related Posts