IMPIMP

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

by bali123
congress balasaheb thorat shivsena sanjay raut upa chairperson ncp sharad pawar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या युपीएच्या वक्तव्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युपीए (UPA) चं नेतृत्व करावं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, राऊत शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का. यावर पुन्हा भाष्य करत राऊत म्हणाले यूपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय आहे. राज्य स्तरावरील, जिल्हा स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये. यावर आता नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलंय असं ते म्हणाले होते. राऊतांच्या वक्तव्यामुळं नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यांच्यात गल्लत होत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. एका वाहिनीसोबत ते बोलत होते.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

‘काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे, कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे’
बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat म्हणाले, युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळं अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही.

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्ल होते…’
पुढं बोलताना बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat  म्हणाले, संजय राऊत एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचंही आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्ल होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. असं वक्तव्य करून मनात दोष निर्माण होतो. हे त्यांनी करू नये असं स्पष्ट मत देखील थोरात यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

‘असं वक्तव्य करून भेद निर्माण करण्याची काही गरज नाही’
बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat  म्हणाले, अशा वक्तव्यांमुळं नाराजी होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून असं वक्तव्य करून भेद निर्माण करण्याची काही गरज नाही असंही थोरात यावेळी म्हणाले.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts