IMPIMP

pralhad patel : आईला ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याची तरुणाची तक्रार, केंद्रीय मंत्र्याची ‘दोन कानाखाली’ देण्याची धमकी

by Team Deccan Express
coronavirus in india two slaps union minister answer to a person who is seeking oxygen

दमोह (भोपाळ) : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सरकारकडून कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील दमोह भागात उभारण्यात आलेल्या एका कोव्हिड केअर सेंटरचं निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल आले होते. त्यावेळी आईला ऑक्सिजन oxygen सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार तरुणाने पटेल यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी ‘असं बोललास तर दोन कानाखाली खाशील’ असे म्हणत आपल्या हरवलेल्या संवेदनशीलतेचा पुरावाच दिला.

Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’

ऑक्सिजनसाठी नागरिकांची धडपड
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांवर उपचार करत असताना ऑक्सिजनचा oxygen तुटवडा भासू लागला आहे. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अत्यंत गंभीर परिस्थितून जात आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्लान्टबाहेर 24 ते 48 तासांपर्यंत रांगेत उभे रहावे लागत आहे. मात्र, या दरम्यान मंत्र्यांची असंवेदनशील व्यक्तव्ये समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

राज्यात कडक निर्बंध असतानाही गोकूळ निवडणूक प्रचारासाठी गर्दी; राजू शेट्टी म्हणतात…

काय म्हणाले मंत्री महोदय ?
मीडियाचे कॅमेरे समोर असताना एका तरुणाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना कोरोना संक्रमित रुग्णाच्या एका नातेवाईकाने ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल तक्रार करत मंत्र्यांना जाब विचारला. मात्र ही बाब मंत्री महोदयांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी या तरुणाला, दोन झापडी ठेवून देण्याची धमकी दिली. यावर झापडीही खाईन पण ऑक्सिजनची व्यवस्था तर करा, असं म्हणत तरुणाने आपली हतबलता व्यक्त केली.

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

मंत्र्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
उद्विग्न झालेल्या तरुणाने म्हटले, हे सगळे आम्हाला मूर्ख बनवत आहेत. 36 तास उलटलेत तरी आम्ही अस्वस्थ आहोत. ऑक्सिजन सिलिंडर देणार असल्याचं सांगितलं जातंय मात्र ऑक्सिजन oxygen काही मिळालेला नाही. ऑक्सिजन नाहीच असं त्यांनी स्पष्ट सांगून टाकावं, असे तरुणाने म्हटले असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

तुम्हाला ऑक्सिजन oxygen सिलिंडर देण्यासाठी कुणी नकार दिलाय का ? असा प्रश्न पटेल यांनी तरुणाला विचारला. यावर तरुणाने हो असे उत्तर देत ऑक्सिजन सिलिंडर मिळाला नसल्याचे सांगितले. केवळ पाच मिनिटांसाठी ऑक्सिजन देण्यात आला. जर ऑक्सिजनची oxygen व्यवस्था होत नसेल तर रुग्णालयानं रुग्णांना दाखल करुन घेण्यास मनाई करावी, असं देखील या तरुणाने म्हटले आहे.

मंत्री महोदयांचे स्पष्टीकरण
या घटनेवरुन संताप व्यक्त होत असताना मंत्री पटेल यांनी यावर स्पष्टीकरण जाहीर केले आहे. हा तरुण डॉक्टर आणि नर्सेस विरुद्ध अभद्र भाषेचा वापर करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असे मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts