IMPIMP

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

by bali123
coronavirus in maharashtra : Chief Minister Uddhav Thackeray's big decision, night curfew in the entire state from Sunday

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 28) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी शुक्रवारी (दि.26) दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, आपण ज्या आरोग्य सुविधांची राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता, त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्याठिकाणी आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेने कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी Uddhav Thackeray दिला आहे.

Coronavirus in Maharashtra : तीन दिवसांत १ लाख केस, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘नियम पाळा, अन्यथा पूर्ण Lockdown’

खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पाहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी Uddhav Thackeray केल्या आहेत.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

 

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts