IMPIMP

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी अजित पवार संतापले ! रश्मी शुक्लांची चौकशी अटळ ?

by bali123
deputy cm ajit pawar got angry rashi shukla phone tapping case

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात पोलीस बदल्यांच्या रॅकेट संदर्भात फोन टॅपिंगचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिले आणि सीबाआय चौकशीची मागणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना फोन टॅपिंग प्रकरणाबद्दल विचारलं असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांच्या परवानगीनंतरच फोन टॅपिंग करता येतं. याबाबतची परवानगी देण्यात आली होती का ? यावरचा सविस्तर अहवाल तत्कालीन गृह विभागाचे अतिरीक्त सचिव आणि सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) लवकरच देणार आहेत. त्यानंतर सत्य लवकरच समोर येईल असं पवारांनी सांगितलं. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
फोन टॅपिंगच्या पुराव्यासंदर्भात प्रश्न केल्यानंतर यावर बोलताना अजित पवार ajit pawar म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंगवर अजित पवार म्हणाले, ‘त्या बदल्या…’

अजित पवारांनी दिले रश्मी शुक्ला यांच्यावरील कारवाईचे संकेत
राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राज्यातील काही अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यावेळी सीताराम कुंटे हे राज्याच्या गृह विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिव पदी कार्यरत होते. हाच धागा पकडून अजित पवार यांनी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

‘मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौर प्रकरणात शिवसेनेच्या खासदाराची लोकसभेत मागणी’ (व्हिडीओ)

लवकरच सीताराम कुंटे यांच्याकडून सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल
गुरुवारी संध्याकाळपर्यंत सीताराम कुंटे यांच्याकडून सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असंही पवारांनी यावेळी सांगितलं. अजित पवार म्हणाले, सीताराम कुंटे हे त्यावेळी गृह विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिव पदावर होते. ते एक साधेसरळ आणि कामात चोख असणारे अधिकारी आहेत याची कल्पना आपणा सर्वांनाच आहे. राज्यावर काही दहशतवादी कारवाईचं संकट किंवा त्यासंदर्भातील काही घटना घडण्याचे धागेदोरे असताना राज्याच्या गृह विभागाकडून परवानगी घेऊन फोन टॅपिंग करता येऊ शकतं. त्यामुळं या प्रकरणात फोन टॅपिंग करण्याआधी सीताराम कुंटे यांची परवानगी घेणं आवश्यक होतं. यासंदर्भातील अहवाल आता सीताराम कुंटे यांना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तो लवकरच सर्वांसमोर येईल असंही पवारांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts