IMPIMP

Video : ‘कोरोना व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला’, CM ठाकरेंचा फडणवीसांना टोला

by sikandershaikh
there was no pressure on fadnavis to reinstate sachin vaze says minister nawab malik

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Corona | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आणि अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली. आमच्याकडे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आहेत, परंतु हे ऐकायला ज्यांनी प्रश्न विचारले ते हवे होते असंही ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हवरून फडणवीसांनी केलेल्या टीकेला जशास तसं उत्तरही दिलं.

‘FB लाईव्हमुळं जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करत होतो. या फेसबुक लाईव्हवरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळं महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली. हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहाराष्ट्रात जनतेच्या घरात पोहोचलो. नागरिकांना धीर मिळाला.

‘व्हायरस म्हणाला, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’

पुढं बोलताना कोरोना (Corona) काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, हा व्हायरस आहे. तो व्हायरस म्हणाला, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरना व्हायरस पुन्हा आला असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला.

‘आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. बंद दाराआडही नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असंही म्हणाले, खोटेपणा आमच्या रक्तात नाही, आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. बंद दाराआडही नाही. यापुढेही कधी खोटं बोलणार नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

Related Posts