IMPIMP

IPS Asim Arun Profile | 28 वर्षांच्या दमदार कारकिर्दीनंतर यूपीचे IPS असीम अरुण यांची राजकारणात एन्ट्री, जाणून घ्या कोणत्या सीटवरून लढवणार निवडणूक

by nagesh
IPS Asim Arun Profile | lucknow up assembly elections 2022 after 28 years of service ips asim arun enters politics to contest up vidhansabha chunav on bjp ticket

नवी दिल्ली : वृत्तसंस्था UP – IPS Asim Arun Profile | कानपूरचे (Kanpur) पहिले पोलीस कमिश्नर आणि 1994 च्या बॅचचे IPS अधिकारी
असीम अरुण (IPS Asim Arun Profile) यांनी व्हीआरएस घेऊन आपल्या करियरची दुसरी पायरी एक राजनेता म्हणून सुरु करणार आहेत. असीम
अरुण भाजपच्या (BJP) तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक (UP Assembly Election) लढवणार आहेत. सूत्रानुसार असे समोर आले आहे कि,
असीम अरुण हे त्यांच्या होम डिव्हिजनमधील कन्नौज सदरमधून निवडणूक रिंगणात उतरू शकतात. असीम अरुण यांची IPS अधिकारी म्हणून चांगली
कारकीर्द आहे. 3 ऑक्टोबर 1970 रोजी बदायूं जिल्ह्यात जन्मलेले असीम अरुण यांचे वडील श्री राम अरुण हे देखील IPS अधिकारी होते. तसेच ते
राज्याचे डीजीपी ही होते. व त्यांची आई शशी अरुण या सुप्रसिद्ध लेखिका आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

असीम अरुण यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण लखनौ येथून केले, व दिल्लीतून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी सिविल सर्विससाठी तयारी केली आणि
त्यामध्ये त्यांची निवड झाली. वडिलांप्रमाणेच त्यांनीही IPS होण्याचा निर्णय घेतला. आपल्या करियरमध्ये, असीम अरुण त्याच्या दमदार कार्यशैलीमुळे
यूपी पोलिसांचा कणा बनले आहेत.

 

 

ISIS दहशतवाद्याला ठार केल्यानंतर खूप चर्चेत आले.

IPS झाल्यानंतर असीम अरुण हे यूपीच्या अनेक जिल्ह्यांचे पोलीस कॅप्टन आणि उपमहानिरीक्षक ही होते. यानंतर ते यूपी एटीएसचे प्रमुख झाले. अरुण
(IPS Asim Arun Profile) तेव्हा खूप चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी लखनौ मध्ये लपून बसलेल्या ISIS दहशदवाल्याला मारले. असीम अरुणला माहिती
मिळाली होती की, कानपूरच्या जाजमाउ केडीए कॉलनीमध्ये राहून ISIS चा दहशतवादी सैफुल्ला लखनौमध्ये लपून खूप मोठी घटना घडवून आणणार
होता. ते अरुणला कळताच त्यांनी एटीएस कमांडो सह ठाकूरगंज परिसरात दहशतवाद्याला घेरले आणि ठार केले.

SPG आणि CBI पर्यंत दिल्या सेवा.

असीम अरुण यांची निडर प्रतिमा आणि दमदार कारकीर्दीमुळे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सिक्युरिटीमध्ये हि
त्यांची निवड झाली होती. त्यामध्ये ते एसपीजीच्या क्लोज प्रोटेक्शन टीमचे प्रमुख होते. तसेच त्यांनी एसपीजी, एनएसजी आणि सीबीआयमध्येही काम केले
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : IPS Asim Arun Profile | lucknow up assembly elections 2022 after 28 years of service ips asim arun enters politics to contest up vidhansabha chunav on bjp ticket

 

हे देखील वाचा :

EPFO Update | जर केले नाही ईपीएफ खात्याशी संबंधीत ‘हे’ काम तर तुम्ही पाहू शकणार नाही अकाऊंट पासबुकच्या डिटेल

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट

 

Related Posts