IMPIMP

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा

by bali123
Jyotiraditya Shinde | role jyotiraditya shinde priyanka chaturvedi leaving congress lok sabha election

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस (Congress) पक्षाला रामराम करून ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी मार्च 2020 मध्ये भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलं. आणि आता लगेच त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे यांना स्थान मिळालं आहे. 2020 च्या त्यांच्या भाजप प्रवेशापूर्वी काँग्रेसला एक धक्का बसला होता आणि त्याला कारणीभूत ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) होते असा खुलासा झाला आहे. त्यावेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठी दिली. आणि लगेच त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश घेतला.

प्रियंका चतुर्वेदी यांच्या काँग्रेस सोडण्यामागे ज्योतिरादित्य शिंदेंच जबाबदार आहे. असं पत्रकार राशिद किदवई यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकात ‘किताब द हाऊस ऑफ सिंधियाज’मध्ये (kitab ‘The House of Scindia’) उल्लेख करण्यात आला आहे. तर, 2014 ते 2019 काळात प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेस पक्षातील सर्वात चर्चेत असलेल्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक होत्या. टीव्ही डिबेटमध्ये प्रियंका मोठ्या आक्रमकपणे पक्षाची बाजू ठामपणे मांडत होती. त्यांनतर लोकसभा व्हायच्या आत म्हणजेच 8 दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम केला. या ठाम भूमिकेमुळे ज्योतिरादित्य शिंदेही चकीत झाले. मात्र, प्रियंका चतुर्वेदी यांच्या काँग्रेस (Congress) सोडण्यामागे कुठंतरी ज्योतिरादित्य शिंदे यांचीच भूमिका होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मूळच्या उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्रा येथे राहणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी सध्या मुंबईत आहेत. 2019 च्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून त्यांना काँग्रेसचं तिकीट हवं होतं.
मात्र, पक्षाने उर्मिला मातोंडकर यांना तिकीट दिलं. यामुळे त्या नाराज होत्या.
तसेच, जेव्हा काँग्रेस पक्ष प्रियांका चतुर्वेदी यांना आग्रा येथून हेमामालिनी यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहणार असल्याचं वादळ निर्माण झालं होतं.
म्हणून स्थानिक नेते चिंतेत होते.
त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे महासचिव आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. दरम्यान, जेव्हा प्रियंका चतुर्वेदी राफेल मुद्द्यावरून 2018 साली आग्रा येथे पत्रकार परिषद घेत होत्या.
यावेळी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर काही पार्टी कार्यकर्त्यांनी चतुर्वेदीसोबत गैरवर्तवणूक केली. परिस्थिती अशी झाली की प्रियंका चतुर्वेदी पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेल्या.
तसेच, त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक करणारा शिवीगाळ देणारा युवक त्यांच्या रुममध्ये घुसला जिथे पत्रकार परिषद सोडून प्रियंका चतुर्वेदी बसल्या होत्या.

यांनतर, चतुर्वेदी यांनी घडलेला प्रकार पक्षनेतृत्वाला सांगितलं.
हे प्रकरण राहुल गांधींपर्यंत (Rahul Gandhi) पोहचले तेव्हा त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा केली.
या घटनेनंतर शिंदे यांनी या प्रकाराला दोषी असणाऱ्या आठ नेत्यांना कारणे बताओ नोटीस जारी करीत त्यांचे निलंबन केले.
मात्र, 8 दिवसांतच या सर्व नेत्यांचे निलंबन रद्द केले. या स्थानिक नेत्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष राज बब्बर (Raj Babbar) यांच्या सांगण्यावरून घेतला.
या सर्व आरोपी कार्यकर्त्यांनी लिखित माफी मागितली आणि परत असं कृत्य करणार नसल्याचं म्हटलं. अशी माहिती मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यानंतर, चतुर्वेदी यांनी पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
मी काँग्रेससाठी दुसऱ्या पक्षाशी लढते.
मात्र, माझ्या स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते असं गैरवर्तवणूक करतात त्यांना काहीही शिक्षा होत नाही.
पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी गुंडांना जास्त महत्त्व दिलं जातं असे त्या म्हणाल्या होत्या.
या घटनेनंतर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा केली परंतु घेतलेला निर्णय बदलण्यास शिंदे यांनी विरोध केला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीचा हवाला पक्ष नेतृत्वाला दिला.
चतुर्वेदी यांना हे सहन झालं नाही म्हणून अचानक काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला.
असे स्पष्टीकरण त्या पुस्तकातून समोर आलं आहे.

Web Title : Jyotiraditya Shinde | role jyotiraditya shinde priyanka chaturvedi
leaving congress lok sabha election

Related Posts