IMPIMP

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना गेला सुधीर मुनगंटीवारांचा तोल, अजित पवारांनी खडसावलं !

by sikandershaikh
maharashtra budget

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Maharashtra Budget | विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी आणि राज्य सरकारवर टीका केली. महाविकास सरकार उडणटप्पू सरकार आहे, करंट आहे असं ते म्हणाले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याबद्दल बोलताना मुनगंटीवारांचा तोल गेला. त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) तात्काळ त्यांना खडसावलं.

‘हे सरकार उडणटप्पू आणि करंट’

राज्य सरकारवर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले, हे सरकार उडणटप्पू आहे आणि हा संसदीय शब्द आहे. विधानसभा चमकवताना 15 कोटी रुपये आहेत परंतु गोर गरिबांसाठी पैसे नाहीत. कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करता आणि त्यांना देण्यासाठी 6-6 महिने पैसे नाहीत. हे करंटं सरकार आहे.

‘हा तर राजकीय लव्ह जिहाद होता’

पुढं बोलताना ते म्हणाले, आमची अजित पवारांशी 72 तासांची मैत्री होती. परंतु मैत्री कायम आहे. शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापन केलं. हा राजकीय लव्ह जिहाद होता असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

आदित्य ठाकरेंवर मुनगंटीवारांनी केली व्यक्तिगत टीका, अजित पवार म्हणाले…

माझं कुटुंब माझी जबाबदारी नंतर मी जबाबदार अशा महाविकास आघाडी सरकारच्या मोहिमेची मुनगंटीवार यांनी खिल्ली उडवली. इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी व्यक्तिगत टीका केली. यावेळी अजित पवार यांनी सभागृहात अशी व्यक्तिगत टीका करू नये अशी विनंती केली. यानंतर अध्यक्षांनी मुनगंटीवार यांचं विधान पटलावरून काढून टाकलं. (Maharashtra Budget)

Related Posts