खा. विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्यांचं राजकीय आयुष्य मेवा लुबाडण्यात गेलं त्यानं शहाणपणा शिकवू नये’

by Team Deccan Express
mp vinayak raut criticize narayan rane after allegations on anil parab and uddhav thackeray

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नियुक्तीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यावरुन नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि.16) पत्रकार परिषद घेऊन अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत vinayak raut यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे धारीष्ठ करु नये, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत vinayak raut यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले, ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे धारिष्ट्य करु नये. नारायण राणेंच्या विरुद्ध आमच्याकडे अनेक पुरावे आहेत.नारायण राणेंनी उद्योगमंत्री असताना अनेक जमिनी हडप केल्या आहेत. या जमिनी वन खात्याच्या किंवा एमआयडीसीच्या असतील. त्यांची अनेक प्रकरणे आज देखील बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्याचं आयुष्याचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परब यांना शाहाणपणा शिकवण्याची गरज नाही.

खुर्चीसाठी वेडापीसा झालेला हा माणूस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याच निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचे काम करत आहेत. मात्र ज्यांना कावीळ झालेली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसतं. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झापटलेला गृहस्थ आहे. त्यांना खुर्ची मिळत नाही म्हणून वेडापीसा झालेला हा माणूस आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने बरळत आहेत.

काय म्हणाले नारायण राणे ?
अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठं नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या, शंभर घेऊन जा. हे काय आहे. चेष्टा लावली आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो, रडत लक्ष्मी अशी टीकाही त्यांनी केली.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts

Leave a Comment