IMPIMP

PM मोदींनी AIIMS मध्ये घेतली कोरोना प्रतिबंधक लस, म्हणाले – ‘या, सर्वजण मिळून भारताला ‘कोरोना’मुक्त करूया’

by sikandershaikh
prime minister narendra modi

नवी दिल्ली : वृत्त संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांनी आज राजधानी दिल्लीत एम्स हॉस्पीटलमध्ये कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला. पीएम मोदी सकाळी सुमारे 6 वाजता एम्समध्ये आले आणि तिथे कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला. देशभरात कोरोना व्हायरस लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि काही गंभीर आजाराने पीडित 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सीन दिली जाणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मोदींनी सकाळी 6.25 वाजता घेतली व्हॅक्सीन
दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये पीएम मोदी यांनी भारत बायोटेकच्या को-वॅक्सीनचा पहिला डोस सकाळी 6.25 वाजता घेतला. या दरम्यान ते 35 मिनिटांपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते आणि ठिक सात वाजता एम्समधून आपले निवासस्थान 7 लोक कल्याण मार्गासाठी रवाना झाले. पुद्दुचेरीत राहणार्‍या सिस्टर पी. निवेदा यांनी त्यांना हा डोस दिला. पीएम यांनी आसामी गमछा परिधान केला होता आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय एम्समध्ये आले होते. पीएम मोदी यांना दुसरा डोस 28 दिवसानंतर दिला जाणार आहे.

सर्व मिळून भारताला कोरोनामुक्त करू – मोदी
व्हॅक्सीन घेतल्यानंतर पीएम मोदी (prime minister narendra modi) म्हणाले, कोरोना व्हायरसविरूद्ध जागतिक लढाई मजबूत करण्यासाठी ज्या वेगाने आपले डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी काम केले आहे ते उल्लेखनीय आहे. जे लोक व्हॅक्सीन घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांना व्हॅक्सीन घेण्याचे आवाहन करतो. सर्व मिळून भारत कोरोनामुक्त करूयात.

व्हॅक्सीन न घेतल्याने विरोधकांनी केली होती टिका
देशात कोरोन लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पीएम मोदी यांच्यावर व्हॅक्सीन न घेतल्याने प्रश्न उपस्थित केले होते. विरोधकांचे म्हणणे होते की, पीएम मोदी आणि त्यांचे मंत्री कोरोना व्हॅक्सीन घेत नाहीत, उलट अनेक देशांच्या प्रमुखांनी जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम स्वता व्हॅक्सीन घेतली होती. विरोधकांनी विचारले होते, अखेर केंद्र सरकारचे मंत्री व्हॅक्सीन घेण्यासाठी का घाबरत आहेत?

Related Posts