IMPIMP

‘…पण या बावळटांना आवरा रे’; चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष टोला

by nagesh
remdesivir bjp chitra wagh reaction ncp rupali chakankar statement devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून घेतले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पोलिस ठाण्यात जाऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फडणवीसांना अटक करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना टोला लगावला.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथे जाऊन सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यावरून चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना टोला लगावत खिल्ली उडवली. त्यांनी ट्विट करून म्हटले, की ‘उठले की निघाले आरोप करायला. आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच देणार होते. संबंधित मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणं झालेले…माहिती तर घ्यायची आधी. सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारच पण या बावळटांना आवरा रे’

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

तसेच रेमडेसिव्हिरअभावी देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी ब्रूक फार्मा कंपनीला विनंती करत नियमाने FDA ची परवानगी घेत आणण्याचा प्रयत्न केला तर कंपनीच्या माणसांनाच पोलिस उचलतात. ब्रूक फार्मा रेमडेसिव्हिरची मदत महाराष्ट्राला करणार होते. त्या कंपनीच्या लोकांना मंत्र्याचा OSD फोनकरून दम देतो? असा आरोपही त्यांनी केला.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts