IMPIMP

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

by pranjalishirish
role election commission not only dubious lafngegiri shiv senas target

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. मात्र यावेळी आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रात लोकशाहीसाठी धक्कादायक घटना घडली. एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आले होते. यामध्ये विशेष म्हणजे भाजप उमेदवाराची ही कार असल्याचं सांगण्यात येतंय. याप्रकरणी संबंधित चार अधिकाऱयांना निवडणूक आयोगाने निलंबित केले. या सर्व प्रकारावरून शिवसेनेने Shiv Sena सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर टीकेचे बाण सोडले आहे. आयोगाची भूमिका संशयास्पद नसून लफंगेगिरीची असल्याचं म्हटलं आहे.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

निवडणूक आयोग मृत झाला आहे.किंवा राज्यकर्त्या पक्षाच्या हुकमाचा विकलांग ताबेदार बनला आहे. मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या नियम पुस्तकातील निष्पक्षतावाले पान फाडून फेकून दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे. सगळयांचे लक्ष प. बंगाल आणि आसामात काय होतेय यावर आहे. निवडणुकांत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या भूमिकेत निवडणूक आयोगाने वावरू नये या अपेक्षेला येथे तडे गेले आहेत, असेही शिवसेनेने Shiv Sena  म्हटले आहे.

Raju Shetty : पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार, महाविकास आघाडीत बिघाडी?

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

निवडणूक आयोगाची गाडी पथारकांडी मतदारसंघात भररस्त्यात खराब झाली. मतदान संपल्यानंतर जमा केलेल्या ‘ईव्हीएम’ याच गाड्यात होत्या. गाडी बंद पडताच तेथे एक गाडी प्रकट झाली. यामध्ये योगायोग म्हणजे जी गाडी प्रकट झाली ती त्याच मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची होती. त्या गाडीत निवडणूक आयोगाचे अधिकारी ‘ईव्हीएम’सह बसले व रवाना झाले. निवडणूक आयोगास ‘ईव्हीएम’ नेण्यासाठी दुसरी गाडीच त्या वेळी मिळू नये? निवडणूक आयोगाची ही भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची आहे. या सर्व प्रकरणात निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपचा मुखवटा फाटला आहे. निवडणूक आयोग पक्षपाती आहे हे सिद्ध करणाऱया घडामोडी रोज घडत आहेत.

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

निवडणूक आयोगाच्या इतिहासातील ही काळी पाने आहेत. आयोगाची हि कृत्ये लोकशाहीला डागाळणारी आहेत. सध्याचा निवडणूक आयोग पावलोपावली असे दुर्वर्तन करीत आहे कि टी. एन. शेषन यांची आठवण पदोपदी यावी. प. बंगालात युद्धासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणास लावणे हे ठीक आहे, पण त्या शक्तिमान रथाचे घोडे म्हणून निवडणूक आयोगाने स्वतःच दावणीला बांधून घ्यावे हे बरोबर नाही.

ममता ज्या मतदार संघातून लढत आहेत तेथील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचल्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते नंदीग्राममध्ये मतदारांना रोखत आहेत, अडथळे आणत असल्याचे निदर्शनास आले. ममता यांनी तत्काळ राज्यपाल जगदीप धनकर यांना फोन करून तक्रार केली. मात्र बिगर भाजपशासित राज्यांतील राज्यपालांकडून सत्य व न्यायाची अपेक्षा तरी कशी ठेवायची?

निवडणूक आयोग, राज्यपाल या घटनात्मकदृष्टय़ा निष्पक्ष जागा आहेत, तेथे संविधानाचा आदर व्हायला हवा या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत. त्यामुळे तटस्थता किंवा निष्पक्षतेचे मूल्य नष्ट झाले आहे. नियमांचे पालन न करणे किंवा राज्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणे हे आता नोकरशहांचे कर्तव्य बनले आहे, पण निवडणूक आयोगासारख्या संस्था तरी या चिखलात अडकू नयेत. शेषन यांची बरोबरी कोणालाच करता येणार नाही, पण त्यांनी जी आदर्श आचारसंहिता देशाच्या लोकशाही रक्षणासाठी जिवंत केली ती एखाद्याच्या राजकीय स्वार्थासाठी जाळू तरी नका.

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

नागरिकांचे मत नक्कीच बहुमोल आहे, पण आपण दिलेले मत नक्की कोणाला गेले याबाबत मतदारालाच शंका येते तेव्हा निवडणूक आयोग कुचकामी किंवा कोणाच्या तरी हातचे बाहुले बनले आहे याची खात्री पटते.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आसाम आणि प. बंगालातील घटनांनी शंका निर्माण झाल्या. बिहारात तेजस्वी यादव यांचा पराभव घडवून आणला गेला व मतमोजणीच्या त्या अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाने डोळे व कान बंद करून घेतले असे लोकांच्या मनात आहे. हे चित्र देशासाठी चांगले नाही. हे प्रकरण ‘ईव्हीएम’वरचा उरलासुरला विश्वास उडविणारे आहेच, पण शिक्कामोर्तब होतेय तो निवडणूक आयोगाच्या झोलबाजीवरही. लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळय़ावर संसदेत तरी चर्चा व्हावी!

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

Related Posts