IMPIMP

बेहिशेबी बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे, DNA चाचणीची प्रतिक्षा… जाणून घ्या NIA ने कोर्टात काय सांगितलं

by bali123
sachin vaze sent nia custody claims being made scapegoat in ambani bomb scare case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई पोलिस दलातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin vaze सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. आज सचिन वाझे sachin vaze यांना विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत 3 एप्रिल पर्यंत रवानगी केली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासातील मुद्दे आज न्यायालयात ठेऊन त्या संदर्भात पुढील तपास करण्यासाठी एनआयएने वाझे याची कोठडी मागितली. एनआयएने केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. यावेळी सचिन वाझेंकडच्या बेहिशेबी 62 बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे अशा अनेक गोष्टी एनआयएने न्यायालयासमोर ठेवल्या. असे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

वाझेंच्या घरात सापडले बेहिशेबी 62 बुलेट्स
इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, वाझे यांच्या घरामध्ये 62 बुलेट्स सापडल्या असून त्याचा कोणताही हिशोब त्यांच्याकडे नाही. याशिवाय त्यांना देण्यात आलेल्या एकूण 30 बुलेट्सपैकी 25 बुलेट्स कुठे गेल्या हे वाझेंना माहित नाही. त्यांच्याकडे फक्त 5 बुलेट्स सापडल्याचे एनआयएने कोर्टासमोर नमूद केले. तसेच 17 तारखेला सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या भेटीचे पुरावे आमच्याकडे आहेत. याच वेळी हिरेन यांनी गाडीची चावी वाझे यांना दिली. त्यानंतर हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याचा दावा केला होता, असे देखील न्यायालयात सांगण्यात आले. एनआयएने मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे डिएनए करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले असून याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच सापडलेल्या गाड्यांमधून देखील नमुने गोळा करण्यात आल्याचे एनआयएने कोर्टासमोर सांगितले. या प्रकरणात आणखी नवीन गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता असल्याचे एनआयएने कोर्टाला सांगितले.

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

सचिन वाझेची न्यायालयाकडे तक्रार
सचिन वाझेला sachin vaze न्यायालयात हजर केले त्यावेळी वाझे यांनी ‘मला बळीचा बकरा बनवलं जातंय’ असा दावा केला. मी तपासात सहकार्य करत असून मला पुन्हा कोठडीत पाठवले जाऊ नये, असे सचिन वाझे याने न्यायालयात नमूद केले. परंतु, न्यायालयाने वाझे यांनी केलेली मागणी फेटाळून लावत त्यांना 3 एप्रिल पर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

Also Read : 

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

 

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Related Posts