IMPIMP

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

by bali123
sanjay raut news slams devendra fadnavis on rashmi shukla case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला प्रकरणात थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत sanjay raut यांनी निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा वारंवार ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात’ असे संजय राऊत sanjay raut म्हणाले.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगमधून अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेतली. मात्र, यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. कोणत्याही परवानगीशिवाय फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच कथित पोलिस भरती रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता राऊत यांनी याचा चांगलाच समाचार घेतला.

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

संजय राऊत sanjay raut म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते फडणवीस हे रश्मी शुक्ला प्रकरणात तोंडावर पडले आहेत. दिल्लीत जाऊन गृह सचिवांची भेट घेण्याची गरज नव्हती. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातच ठेवायला हवी होती. त्यांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात’.

तुमच्याकडे भविष्यातील राष्ट्रीय नेता म्हणून पाहतो
तुम्ही फक्त नागपूरचे नेते नाहीत. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. आम्ही तुमच्याकडे भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो. महाराष्ट्राचा नेता जेव्हा वारंवार या मर्यादा ओलांडतो आणि दिल्लीकडे तोंड करून बघतो. सह्याद्री जेव्हा दिल्लीकडे बघतो, तेव्हा सह्याद्रीचे शिखर ओशाळल्यासारखं वाटते, असेही ते म्हणाले.

Also Read

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

 

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्द

Related Posts