IMPIMP

Sanjay Raut on Nana Patole | ‘मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय तरी का?’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut on Nana Patole | Shivsena leader and MP sanjay raut on nana patole bmc election

मुंबई : सरकारसत्ता  ऑनलाइन – Sanjay Raut on Nana Patole | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षात सतत कुजबूज होताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई (Mumbai) पाण्याखाली गेली नाही, असं म्हणत पटोले यांनी टोला लगावला होता. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली येते. अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. तसेच, त्यांनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत,” असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, ”मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईवर राज्य होतं. पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होतं. पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो.” असं ते म्हणाले.

Web Title : Sanjay Raut on Nana Patole | Shivsena leader and MP sanjay raut on nana patole bmc election

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

Edible Oil Price | सर्वसामान्यांना काहीसा दिलासा ! मोहरी, शेंगदाणा तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Gopichand Padalkar | ‘पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा …’ गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

LPG Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या

Related Posts