IMPIMP

Sharad Pawar : ‘एका पोलिसामुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर कुठलाही परिणाम होणार नाही’

by bali123
sharad pawar statement on sachin vaze case

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझे प्रकरणावर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष मिळून काम करत आहेत. एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या प्रकरणामुळे  सरकारच्या भवितव्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. आता या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी सुरु असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. सरकारसमोर काही समस्या येत असतात. त्यावर आम्ही मिळून तोडगा काढतो, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणी राज्याच्या गृह खात्याने योग्य कारवाई केली आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना समोर आणले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनामाच्या प्रश्न येत नाही, असे म्हणत पवारांनी देशमुख यांची पाठराखण केली आहे.  सरकार समोर काही समस्या येत असतात. पण मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा करून त्या सोडवल्या जातात.  मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार मिळून काम करत असून सरकार सुरळीत चालले आहे. आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे  पवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्याबाबतही पवारांना यांना प्रश्न विचारला गेला. पण या संदर्भात मुख्यमंत्रीच उत्तर देतील, असे ते म्हणाले. तसेच भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभारण्याची गरज आहे. पण त्यावर अद्याप ठोस कुठीलीही चर्चा झालेली नाही. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी तिसरी आघाडी उभी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.  पण अद्याप याला कुठलंही स्वरुप आलेले नाही असे पवार यांनी म्हटले आहे.

NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

 

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts