IMPIMP

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

by pranjalishirish
Modi Government | corona vaccine stocks in the Maharashtra are not low the news is false explained by center government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. अतिप्रचंड वेगाने होत असलेले संक्रमण आणि रुग्णवाढीचा विस्फोट आणि लसीकरण यामुळे राज्याच्या आरोग्यावर प्रचंड ताण आला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 15 ते 30 एप्रिल हा कोरोनाचा पिक अवर असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊनकडे वळताना दिसत आहे. मात्र, लॉकडाऊनवरुन भाजपने BJP विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांचा शिवसेनेनं आपल्या सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेतला आहे.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

नोटबंदी, लॉकडाऊन याची ओळख पंतप्रधान मोदींनीच देशाला करुन दिली आहे. वर्षभरापूर्वी मोदींनी केलेल्या लॉकडाऊनचं भाजप कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवून स्वागत केले. आज कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे. याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवायला हवे. महाराष्ट्रात भाजपचा BJP मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्रातील जनतेनं का मोजावी ? असा सणसणीत टोला शिवसेनेने लगावला आहे.

‘अर्थचक्र कि अनर्थचक्र ?’ निर्णय घ्यायलाच हवा

कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र भाजपने लॉकडाऊनला विरोध केला आहे. राज्याचे अर्थचक्र बिघडेल आणि लोकांचा उद्रेक होईल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपच्या या भूमिकेचा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेताना, लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडेल हे विरोधी पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे. 15 एप्रिलनंतर राज्याची कोरोना स्थिती गंभीर होईल, असं मुख्य सचिव सीताराम कुंटे हेच सांगतात. तेव्हा त्याचे गांभीर्य विरोधी पक्षानं समजून घेतले पाहिजे. ‘अर्थचक्र कि अनर्थचक्र ?’ यावर तत्काळ निर्णय घ्यायलाच हवा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

राज्यात Lockdown लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला सरकारचा ‘विचार’

महाराष्ट्राच्या जनतेनं किंमत का मोजावी ?

राज्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक यासारखी शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. दोशातला कोरोना संसर्गाचा आकडा दीड लाखांच्या वर गेला आहे. त्यामुळे या संकटाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्रातील जनतेने का मोजावी ? आणि बाजूच्या गुजरात राज्यात भाजपचे BJP राज्य असूनही तिथे कोरोना आटोक्यात आलेला नाही. उलट सुरत, अहमदाबादमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्या ठिकाणचे मुख्यमंत्री व्यापाऱ्यांचे नुकासान होईल म्हणून लॉकडाऊन करत नाहीत. व्यापाऱ्यांचा पक्ष फक्त व्यपाऱ्यांचा विचार करणार असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

कोणीही राजकीय धुळवड करु नये

शिवसेनेने आपल्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, व्यापार, उद्योग, राजकारण, मंदिर, मशिद, शाळा जिथल्या तिथेच राहतील. मात्र माणूसच जिवंत राहिला नाही तर काय कराल ? या जगात माणसाच्या जिवाशिवाय दुसरं काहीच मोलाचे नाही. ना ईश्वर, ना धर्म, ना पैसा, ना राजकारण ! तेव्हा कोरोना संकटप्रश्नी कोणीही राजकीय धुळवड करु नये, हेच बरे, असे म्हटले आहे.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts